डीवायएसपी गुरवांना शिक्षा म्हणून नागपूरला पाठविले पण ते पुण्यात आले - Suraj Gurav finally promoted as Superintendent of Anticorruption | Politics Marathi News - Sarkarnama

डीवायएसपी गुरवांना शिक्षा म्हणून नागपूरला पाठविले पण ते पुण्यात आले

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

श्री. गुरव यांनीही बदलीला आव्हान देण्याचा विचार केला होता. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार त्यांनी त्या बदलीला आव्हान देण्याचे विचार बदलला. त्यामुळे अवघ्या आठवड्यातच त्यांची नागपूर येथून पुन्हा बदली करण्यात आली. त्यातच श्री. गुरव यांना पुण्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक पद मिळाले आहे.

कऱ्हाड : संघटीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलेल्या कऱ्हाडचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांची अखेर पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. श्री. गुरव यांच्या जागी डॉ. रणजीत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 

डॉ. रणजित पाटील खोपोलीहून बदली होऊन कऱ्हाड येथे येत आहेत. ते डायरेक्ट डीवायएसपी आहेत. पोलिस उपाधीक्षक श्री. गुरव तडकाफडकी नागपूर येथे एक ऑक्टोबरला बदली झाली होती. त्यांच्या त्या बदलीला राजकीय झालर होती. त्यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी कऱ्हाडमधील नागरीकांनी पाच ऑक्टोबरला मोर्चाही काढला होता.

श्री. गुरव यांनीही बदलीला आव्हान देण्याचा विचार केला होता. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार त्यांनी त्या बदलीला आव्हान देण्याचे विचार बदलला. त्यामुळे अवघ्या आठवड्यातच त्यांची नागपूर येथून पुन्हा बदली करण्यात आली. त्यातच श्री. गुरव यांना पुण्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक पद मिळाले आहे. श्री. गुरव यांच्या जागी डॉ. रणजीत पाटील यांची नेमणूक शासनाने केली आहे.

काल रात्री उशिरा त्या बदल्या नव्याने करण्यात आल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. श्री. गुरव यांनी कऱ्हाड व परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले होते. रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली की, पोलिसांचा चोप ठरलेलाच असायचा. गुंडाचे स्टेटस् ठेवले की, पोलिसांची पायरी झिजवायलाच लागायची अशा डझनहून अधिक चांगल्या कारवाई केल्या होत्या.

याबरोबरच मोक्का, खून, चोरी आदींचे तपासही अव्वल करणाऱ्या, गुंडांमध्ये वचक निर्माण करणाऱ्या पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांच्या बदलीने मात्र खळबळ उडाली होती. पोलिस उपाधिक्षक गुरव यांची कऱ्हाडला वर्षापूर्वी 22 सप्टेंबर 2019 ला बदली झाली. येथे वर्षभराची कालावधी पूर्ण होतोय त्याला चार दिवसही झाले नव्हते. तोपर्यंत त्यांची बदली झाली त्यांच्या जागी रणजीत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख