नवीन पिंपरी पालिका आयुक्तांचे स्वागत नोटीशीने 

पवार यांना निलंबित करून या घोटाळ्यातील इतरांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी या नोटीशीव्दारे करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे तो झाल्याचे सांगून त्याला नुकतेच बदली झालेले आयुक्त श्रावण हर्डीकर जबाबदार असल्याचा दावा बहल यांनी केला.
Pimpri Municipal Commissioner was welcomed with a legal notice
Pimpri Municipal Commissioner was welcomed with a legal notice

पिंपरी : कालच (सोमवारी) पदभार स्वीकारलेले पिंपरी पालिकेचे आय़ुक्त राजेश पाटील यांचे स्वागत कायदेशीर नोटीशीने झाले. कोरोना सेंटरमध्ये अतिरिक्त आय़ुक्तांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीने आयुक्तांना कारवाई करण्याची ही नोटीस दिली आहे. कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

 पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी हा आर्थिक घोटाळा केल्याचा आऱोप शहराचे माजी महापौर व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर ज्येष्ठ नेत्या मंगला कदम, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शाम लांडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप उपस्थित होते. 

पवार यांना निलंबित करून या घोटाळ्यातील इतरांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी या नोटीशीव्दारे करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे तो झाल्याचे सांगून त्याला नुकतेच बदली झालेले आयुक्त श्रावण हर्डीकर जबाबदार असल्याचा दावा बहल यांनी केला. श्री. बहल म्हणाले, अजित पवार यांची पुण्यात जात पडताळणी समितीवर बदली झालेली आहे. तरीही त्यांनी येथे राहून स्थायी समितीची परवानगी न घेता एकही रुग्ण न तपासलेल्या भोसरीतील दोन कोरोना सेंटरला तीन कोटी १४ लाख एक हजार नऊशे रुपयांचे बिल हे सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलला अदा केले आहे. 

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे हे सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हेल्थकेअर प्रा. लि. ने करार न करता तसेच अनामतही न ठेवता पाच कोटी २६ लाख ६० हजार आठशे रुपयांचे बिल बिनधास्त पालिकेला दिले होते.तसेच अतिरिक्त आय़ुक्तांना एक कोटी रुपयांपर्यंतची बिले मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यात वैद्यकीय विभागाची जबाबदारी दुसरे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे होती.असे असूनही पवार यांनी अनाधिकाराने स्थायीची परवानगी न घेता हे बिल दिले. त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांच्याकडून या बिलाचे पैसे वसूल करण्यात यावेत. त्यांच्या या कटकारस्थानात सामील असलेल्या स्पर्शचे डॉक्टर व इतर सबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी.

महापालिकेत सत्ताधारी भाजपला लक्ष्य करताना श्री. बहल म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत सर्वसामान्यांचा जीव वाचविण्याला महत्त्व देण्याऐवजी स्वत:ची खळगी भरण्याला भाजपने महत्व दिले. या कालावधीत भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी प्रशासनातील काही ठराविक अधिका-यांना हाताला धरून बेधुंद कारभार व भ्रष्टाचार केला. कोविड सेंटरच्या नावाखाली १६ कोटी रूपयांची लुट केली आहे. त्यातील स्पर्श हॉस्पिटलच्या माध्यमातून साडेतेरा कोटी रूपयांची लुट झाली आहे.

तर, इतर कोविड सेंटरच्या नावाखाली अडीच कोटी रूपयांचा दरोडा महापालिकेच्या तिजोरीवर टाकण्यात आला आहे.हा सर्व प्रकार भाजप पदाधिका-यांच्या आशीर्वादानेच करण्यात आलेला आहे.ही संपूर्ण बेकायदेशीर प्रक्रिया महापलिकेत बेकायदेशीररीत्या कार्यरत असलेल्या अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी राबविलेली असल्याचे कागदपत्रांवरून समोर येत आहे. दरम्यान,बहल यांच्या आरोपावर आपली बाजू देण्यासाठी वारंवार संपर्क करूनही पवार यांच्याशी तो होऊ शकला नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com