''एक कार्यकर्ता एक रेमडिसिव्हर इंजेक्शन''...राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संकल्पना - "One worker, one remdesivir injection" ... The concept of NCP workers | Politics Marathi News - Sarkarnama

''एक कार्यकर्ता एक रेमडिसिव्हर इंजेक्शन''...राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संकल्पना

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद, आमदार शशिकांत शिंदे यांचा १९ ऑक्टोबरला वाढदिवस असून हा वाढदिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी जिल्ह्यातील कोविडच्या रूग्णांसाठी समाज उपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.

सातारा : कोविड रूग्णांना जीवरक्षक ठरलेल्या रेमडिसिव्हर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक अनोखी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा  ''एक कार्यकर्ता एक रेमडिसिव्हर इंजेक्शन''...ही संकल्पना राबविण्याचा तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ही इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासोबतच ऑक्सिजन सिलिंडर व मशिनस्‌ही दिले जाणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद, आमदार शशिकांत शिंदे यांचा १९ ऑक्टोबरला वाढदिवस असून हा वाढदिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी जिल्ह्यातील कोविडच्या रूग्णांसाठी समाज उपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.

त्यानुसार "एक कार्यकर्ता एक रेमडिसिव्हर इंजेक्शन" ही संकल्पना राबविली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात रेमडिसिव्हरची इंजेक्शन, ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन मशीन देण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पक्ष संघटना यावर चर्चा करण्यात आली.

१९ ऑक्टोबरला आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा न करता कोरोनाच्या लढाईसाठी उपक्रम राबवत समर्पित करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने काही संकल्पना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये " एक कार्यकर्ता एक इंजेक्शन" अशी संकल्पना डॉ. होळ यांनी मांडली.

एक कार्यकर्ता एक रेमडिसिव्हर इंजेक्शन देऊन योगदान देण्याची ही संकल्पना आहे. त्यासोबतच ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक केंद्र आणि उपकेंद्रात ही सुविधा देण्याचा निर्णय झाला. या संकल्पनेबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. या उपक्रमात सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. होळ, भास्कर कदम, शिवाजी महाडिक यांनी हे आवाहन केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख