आमदार हनी ट्रॅपप्रकरणी साताऱ्यातील एकास अटक; दोघांचा शोध सुरू

त्या युवतीनेच याची माहिती आमदारांच्या पुतण्यास फोन करून दिली. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.
आमदार हनी ट्रॅपप्रकरणी साताऱ्यातील एकास अटक; दोघांचा शोध सुरू
One arrested in Satara in MLA Honey Trap case; The search for both continues

सातारा : खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी 'हनी ट्रॅप' रचणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोघांचा शोध सातारा तालुका पोलिस घेत आहेत. 

खेड-आळंदीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याच्या हेतूने त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा डाव शैलेश शिवाजी मोहिते-पाटील याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी आखला होता. मात्र, या डावातील युवतीने याबाबतची माहिती आमदार मोहिते पाटील यांच्या पुतण्या मयुर साहेबराव मोहिते पाटील यांना दिली.

त्यामुळे मयुरने सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी साताऱ्यातील सोमनाथ दिलीप शेडगे याला ताब्यात घेतले आहे. इतर दोघांचा शोध सातारा तालुका पोलिस घेत आहेत. या प्रकरणी आमदारांचे पुतणे मयुर साहेबराव मोहिते-पाटील यांनी शुक्रवारी फिर्याद दिली होती. यातील शैलेश मोहिते पाटील हा आमदारांचा दूरचा नातेवाईक आहे. 

यामध्ये शैलेश शिवाजी मोहिते-पाटील आणि राहूल किसन कांडगे यांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये ओढत बदनामी करण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला एक लाख रुपये संशयितांनी दिले होते.

मात्र, त्या युवतीनेच याची माहिती आमदारांच्या पुतण्यास फोन करून दिली. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in