चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना नवं बळ - New strength to rickshaw drivers on the occasion of Chandrakant Patil's birthday | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना नवं बळ

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

आपल्या कमाईतील काही भाग वंचितांसाठी कोरोना काळात कष्टकरी वर्गाला आरोग्य समस्येसह आर्थिक संकटाचा ही मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला, अशावेळी आपल्या कमाईतील काही भाग वंचितांसाठी दिला जावा अशी समाजातील अनेकांची भावना दिसून आली हीच आपली संस्कृती आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे : भारतीय जनता पार्टीचे BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुण्यातल्या रिक्षाचालकांना नवं बळ दिलं आहे. वाढदिवसानिमित्त जाहिरातीवर होणारा खर्च टाळून समाजयोगी उपक्रमाची परंपरा कायम राखत रिक्षाचालकांना एक हजार रुपयांच्या सीएनजी गॅसच्या कुपन्सचे वाटप केले. जवळपास दोन हजार रिक्षाचालकांना या उपक्रमाचा लाभ झाला. New strength to rickshaw drivers on the occasion of Chandrakant Patil's birthday

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दरवर्षी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करतात. मात्र, या निमित्ताने समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या काढा आदींचे वाटप केले होते.यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार-तुरे नको, वंचितांसाठी लस आणि रिक्षावाले काकांसाठी सीएनजी कुपन भेट देण्याचा संकल्प केला. 

हेही वाचा : नीळकंठरावांच्या प्रवेशाने पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल : ईश्‍वर बाळबुधे

त्यानुसार पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयात कोथरूडमधील रिक्षाचालकांना एक हजार रूपये किमतीच्या सीएनजी कुपन्सचे वाटप केले. याचा लाभ जवळपास दोन हजार रिक्षाचालकांनी घेतला. उद्यापासून त्या सर्व कुपनधारकांना पौंड रोड येथील साई पेट्रोल पंप येथून सीएनजी गॅस मिळणार आहे.दरम्यान, मंगळवारी (ता. ८) रोजी वंचितांच्या लसीकरणासाठी कुपन वाटप करण्यात आले. याला ही कोथरूडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नावनोंदणी केले. यातून  जवळपास तेराशे जणांना लसीकरणासाठी कुपन देण्यात आले. या सर्वांचे १० आणि ११ जून रोजी लसीकरण होणार आहे. 

आवश्य वाचा : जितिन प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी; योगींनी दिले संकेत

आपल्या कमाईतील काही भाग वंचितांसाठी कोरोना काळात कष्टकरी वर्गाला आरोग्य समस्येसह आर्थिक संकटाचा ही मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला, अशावेळी आपल्या कमाईतील काही भाग वंचितांसाठी दिला जावा अशी समाजातील अनेकांची भावना दिसून आली हीच आपली संस्कृती आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले. अभिनेते आनंद इंगळे यांच्या सहकार्याने क्रिएटिव्ह फाउंडेशनने आयोजित केलेल्या घरेलू कामगारांना किराणा किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी प्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे,राहुल सोलापूरकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कार्यक्रमाच्या संयोजिका शिक्षण मंडळ अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, उपाध्यक्ष डॉ संदीप बुटाला,कोथरूड मंडळ अध्यक्ष पुनीत जोशी,महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, जयश्री तलेसरा, मंगलताई शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ अथनीकर, युवा मोर्चा शहर सरचिटणीस दीपक पवार,किरण देखणे, निलेश कोंढाळकर, विशाल रामदासी व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख