MLC Mohanrao Kadam Tested Corona positive | Sarkarnama

आमदार मोहनराव कदमांसह त्यांचे कुटुंबिय कोरोनाबाधित

संपत मोरे
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

आमदार मोहनराव कदम यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. तरीही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. आमदार कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्वांवर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

पुणे : पुणे-सांगली जिल्ह्याचे जेष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी यशोदा कदम, सुपुत्र शांताराम कदम आणि नातू दिग्विजय कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

मोहनराव कदम यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत तरीही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मोहनराव कदम हे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे चुलते आहेत.

ते सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार आहेत. यापूर्वी त्यांचे सुपुत्र डॉ. हणमंतराव कदम त्यांच्या स्नुषा सुनीता आणि नातू डॉ. जितेश कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता त्यांच्या पत्नी यशोदा, मुलगा शांताराम, आणि नातू दिग्विजय यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

आमदार मोहनराव कदम यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. तरीही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. आमदार कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्वांवर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख