महाविकास आघाडीचा उदयनराजेंना धक्का; टोलनाके काढून घेतले - Mahavikas Aghadi pushes MP Udayanraje; Toll plaza removed | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीचा उदयनराजेंना धक्का; टोलनाके काढून घेतले

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

 साताऱ्यातील आनेवाडी व पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्यांचा समावेश आहे. या दोन्ही टोलनाक्यांचे व्यवस्थापन अशोका स्थापत्य या कंपनीकडे होते. ही कंपनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांची आहे. हे व्यवस्थापन एक एप्रिलपासून बदलणार होते. 

सातारा : सातारा-कोल्हापूर महामार्गावरील साताऱ्यातील आनेवाडी व पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यांचा ठेका अशोका स्थापत्य या कंपनीकडून काढुन तो शिवसेना व राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राजकिय धक्का महाविकास आघाडीने दिल्याचे बोलले जात आहे.

अशोक स्थापत्य ही कंपनी साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांची आहे. येत्या तीन एप्रिलला हे व्यवस्थापन बदलले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या टोलनाक्यांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील सातारा ते पुणे मार्गावरील दोन टोलनाक्यांचे व्यवस्थापन येत्या तीन एप्रिलपासून बदलले जाणार आहे.

यामध्ये साताऱ्यातील आनेवाडी व पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्यांचा समावेश आहे. या दोन्ही टोलनाक्यांचे व्यवस्थापन अशोका स्थापत्य या कंपनीकडे होते. ही कंपनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांची आहे. हे व्यवस्थापन एक एप्रिलपासून बदलणार होते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन तीन दिवसांपासून साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

आनेवाडी टोलनाक्यावरून यापूर्वी साताऱ्यात अनेक किस्से घडलेले आहेत. या टोलनाक्याचे व्यवस्थापन आपल्याकडे यावे यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थक नगरसेवकाने प्रयत्न केले होते. त्यावेळी साताऱ्यातील दोन्ही राजांमध्ये संघर्ष झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा खासदार उदयनराजे समर्थक असलले अशोक सावंत यांच्या अशोका स्थापत्य या कंपनीकडेच दोन्ही टोलनाक्यांचे व्यवस्थान राहिले.

पण एक एप्रिलपासून या दोन्ही टोलनाक्यांचे व्यवस्थापन बदलाच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानुसार गेल्या दोन, तीन दिवसांपासून टोलनाक्यांवर पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. आता अशोक स्थापत्य या कंपनीकडून या दोन्ही टोलनाक्यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके तसेच शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्याकडे देण्यात आहे. येत्या तीन एप्रिलला नवीन व्यवस्थापन येणार आहे. या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना राजकिय धक्का दिल्याचे बोलले जात आहे. 

या टोलनाक्यांच्या माध्यमातून स्थानिक तरूणांना रोजगार मिळावा, यासाठी त्याचा उपयोग होईल. टोलवरील कर्मचारी पुरविण्याचे हे कंत्राट आहे. प्रत्यक्ष टोल वसुलीची रक्कम आम्ही गोळा करणार नाही. ही वसुलीची रक्कम बँकेकडे जमा होणार आहे. 
- सचिन दोडके (नगरसेवक, पुणे)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख