शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या अबू आझमी यांची चौकशी करा : भातखळकर यांचे शहा यांना पत्र

शेतकरी आंदोलनात राजकीय भाषण करून लोकांना भडकविण्याचे काम आझमी यांनी केले. त्याच्याच दुसऱ्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केले. त्यात खालिस्तानी झेंडेही फडकवण्याच्या देशद्रोही घटना घडल्या, असा दावा भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे अशाप्रकारे प्रक्षोभक भाषण करून शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या आझमींची चौकशी करा. तसेच यामागे आणखी कोणी कर्ता करविता आहे का, याचीही चौकशी करा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
Inquire about Abu Azmi who provoked farmers: Bhatkhalkar's letter to Shah
Inquire about Abu Azmi who provoked farmers: Bhatkhalkar's letter to Shah

मुंबई : शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना चिथावणी देणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी तसेच त्यांच्या सूत्रधारांची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर काल दिल्लीत शेतकऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनात किमान नव्वद पोलिस जखमी झाले आहेत. तर त्याच्या आदल्या दिवशी (सोमवारी) मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनातील जाहीर सभेत बोलताना अबू आझमी यांनी शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. यासंदर्भातच त्यांनी शहा यांना पत्र लिहून वरील मागणी केली आहे.

कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने तीन कृषी विषयक कायदे संमत केले आहेत. मात्र, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही विरोधी पक्ष शेतकऱ्यांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनातील जाहीर सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.

त्यांच्यासमोर अबू आझमी यांनी प्रक्षोभक भाषण करताना, देशात वादळ निर्माण करा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. ही हवा तुम्हाला भस्मसात करुन टाकेल असा इशाराही आझमी यांनी पंतप्रधान मोदी यांना यावेळी दिला होता. मोदीजी तुम्ही संपून जाल अशा धमक्याही आजमी यांनी दिल्याचा दावा भातखळकर यांनी या पत्रात केला आहे. 

शेतकरी आंदोलनात राजकीय भाषण करून लोकांना भडकविण्याचे काम आझमी यांनी केले. त्याच्याच दुसऱ्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केले. त्यात खालिस्तानी झेंडेही फडकवण्याच्या देशद्रोही घटना घडल्या, असा दावा भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे अशाप्रकारे प्रक्षोभक भाषण करून शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या आझमींची चौकशी करा. तसेच यामागे आणखी कोणी कर्ता करविता आहे का, याचीही चौकशी करा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com