कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच एसपींना आयजींनी दिला 'कानमंत्र'   - IG gives 'ear mantra' to five SPs in Kolhapur constituency | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच एसपींना आयजींनी दिला 'कानमंत्र'  

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

खुद्द आयजी मनोजकुमार लोहिया यांनी देखील एक महिन्यापूर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचा पदभार घेतला आहे. त्यानंतर पाचही जिल्ह्यात सर्व पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून नव्याने त्यांनी त्या-त्या ठिकाणचा पदभार घेतला आहे. पुणे ग्रामीणला डॉ. अभिनव देशमुख, सोलापूर ग्रामीणला तेजस्वी सातपुते, कोल्हापूर शैलेश बलकवडे, सातारला अजयकुमार बन्सल तर सांगली दीक्षित गेडाम यांनी कार्यभार स्वीकारला आहे.

सातारा : कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्याअसून नवीन अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला आहे. या नवीन पोलिस अधीक्षकांची महत्वपूर्ण बैठक साताऱ्यात विशेष पोलिस महानिरिक्षक मनोजकुमार लोहिया यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी नवरात्रोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासंदर्भातील सूचना करून काही महत्वपूर्ण गोष्टींचा कानमंत्रही दिला आहे.  

कोल्हापूर परिक्षेत्रात तब्बल पाच जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या जागी नव्याने आलेल्या पोलिस अधीक्षकांनी त्या-त्या ठिकाणचा पदभार स्वीकारला आहे. या पोलिस अधीक्षकांची विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी सोमवारी साताऱ्यात महत्वपूर्ण बैठक घेतली. 

या बैठकीत आयजींसह पाचही पोलिस अधिकारी नवे असल्याने त्यांनी एकमेकांची 'ओळख परेड' घेतली. राज्यात पोलिस दलात सध्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. गेल्या महिन्याभरात तीनवेळा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रात देखील पाचही जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

यामध्ये खुद्द आयजी मनोजकुमार लोहिया यांनी देखील एक महिन्यापूर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचा पदभार घेतला आहे. त्यानंतर पाचही जिल्ह्यात सर्व पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून नव्याने त्यांनी त्या-त्या ठिकाणचा पदभार घेतला आहे. पुणे ग्रामीणला डॉ. अभिनव देशमुख, सोलापूर ग्रामीणला तेजस्वी सातपुते, कोल्हापूर शैलेश बलकवडे, सातारला अजयकुमार बन्सल तर सांगली दीक्षित गेडाम यांनी कार्यभार स्वीकारला आहे.

प्रारंभी सातारा पोलिस मुख्यालयात आयजी मनोजकुमार लोहिया यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पाचही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांची आयजींनी बैठक घेतली. सातारा एसपींच्या दालनातच सुमारे दीड तास मॅरेथॉन बैठक झाली. यावेळी आयजींनी जिल्हानिहाय पोलिस अधीक्षकांचा आढावा घेतला. यावेळी पाचही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना केल्या तसेच आगामी काळात कशापध्दतीने वाटचाल करायची याचा कानमंत्रही त्यांनी एसपींना दिला. 
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख