'रयत' सदस्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन; होळकर स्मारक संवर्धन समितीचा इशारा

होळकर ट्रस्टने १९५५ रोजी किल्ल्यातील काही जागा शैक्षणिक कामासाठी बक्षीसपत्राने दिली होती. या ठिकाणी शाळेच्या चार खोल्या असताना तब्बल २७ शौचालये बांधली. ही बांधकामे किल्ल्याच्या मूळ रचनेला बाधा आणत आहेत.
Holding agitation in front of the houses of 'Rayat' members; Warning of Holkar Memorial Conservation Committee
Holding agitation in front of the houses of 'Rayat' members; Warning of Holkar Memorial Conservation Committee

सातारा : वाफगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असणाऱ्या ठिकाणची ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील रयत शिक्षण संस्थेची शाळा तातडीने हलविण्यात यावी. या प्रकरणी ३० ऑगस्टपर्यंत संस्थेने निर्णय घ्यावा. अन्यथा, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व रयत कार्यकारिणी सदस्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समितीचे महासचिव भगवानराव जऱ्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. Holding agitation in front of the houses of 'Rayat' members; Warning of Holkar Memorial Conservation Committee

समितीच्या सदस्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. समितीच्या मुख्य सल्लागार डॉ. अर्चना पाटील, उपाध्यक्ष युवराज तिखोले, बापूराव सोनवलकर, योगेश धरम, चंद्रकांत वाघमोडे, वसंतराव घुले उपस्थित होते. श्री. जऱ्हाड म्हणाले,''श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव असणाऱ्या वाफगाव येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला २७२ वर्षांपूर्वीचा आहे. या वास्तूत संरक्षित खोल्या, भुयारे, दगडी कमानीच्या अप्रतिम कलाकुसरीच्या दगडीरचना आहेत. 

होळकर ट्रस्टने १९५५ रोजी किल्ल्यातील काही जागा शैक्षणिक कामासाठी बक्षीसपत्राने दिली होती. या ठिकाणी शाळेच्या चार खोल्या असताना तब्बल २७ शौचालये बांधली. ही बांधकामे किल्ल्याच्या मूळ रचनेला बाधा आणत आहेत. या वास्तूला संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी समितीचा २००७ पासून राज्य शासन, पुरातत्त्‍व विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.'' 

सोनवलकर म्हणाले, ''स्मारक संवर्धन समितीने साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवांना तीन महिन्यांपूर्वी भेटून ही वास्तू संरक्षित स्मारक होणे व त्याची डागडुजी करणेकामी राज्य शासनाकडे हस्तांतरित करावी, या मागणीचे निवेदन दिले होते. सहसचिवांनी समन्वयकांना निर्णय कळविला जाईल, असे आश्वासन देऊन चार महिने उलटले तरी संस्थेने काहीच उत्तर दिले नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com