नोकरीसाठी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट पत्र; पुण्‍यातील महिलेवर गुन्‍हा 

याप्रकरणी आकाश हुंबे यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात फसवणूकीची तक्रार नोंदवली. यानुसार अनिता भिसे हिच्‍यावर फसवणूकीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.
नोकरीसाठी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट पत्र; पुण्‍यातील महिलेवर गुन्‍हा 
Forged letter signed by the District Collector for the job; Crime against a woman in Pune

सातारा : मंत्रालयात नोकरीस असल्‍याचे सांगत शिरंबे (ता. कोरेगाव) येथील युवकास पुणे जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या सहीचे बनावट नियुक्‍तीपत्र देत दीड लाखांचा गंडा घातल्‍याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात अनिता देवानंद भिसे (रा. पुणे) या महिलेवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. Forged letter signed by the District Collector for the job; Crime against a woman in Pune

शिरंबे (ता.कोरेगाव) येथे आकाश भीमराव हुंबे हे राहण्‍यास आहे. तो वाढेफाटा येथे सुरु असणार्‍या गृहनिर्माण प्रकल्‍पात साईट सुपरवायझर म्‍हणून कामास आहे. याठिकाणी अनिता देवानंद भिसे या फ्‍लॅट खरेदीसाठी आल्‍या होत्‍या. वारंवार येत असल्‍याने भिसे आणि हुंबे याची ओळख झाली. ओळखीनंतर भिसे यांनी मी मंत्रालयात नोकरीस असून तुला शासकीय नोकरी मिळवून देते, असे सांगितले. 

यानुसार २०१८ पासून हुंबेने भिसे हिला दीड लाख रुपये दिले. यानंतरच्‍या काळात भिसे हिने हुंबे याला हवेली तहसील कार्यालयात नेमणुक झाल्‍याचे पत्र दिले. यापत्रात पुणे जिल्‍हाधिकारी कार्यालयात हजर होण्‍यासाठीची तारीख नमुद करण्‍यात आली होती. यानुसार हुंबे हा पुणे जिल्‍हाधिकारी कार्यालयात गेला. याठिकाणी जाण्‍यापूर्वी त्‍याने भिसेला फोन केला. फोन केल्‍यानंतर भिसे त्‍याला पुणे जिल्‍हाधिकारी कार्यालयात भेटल्‍या.

हुंबेकडील नियुक्‍तीपत्र काढुन घेत साहेबांना भेटून येते, असे सांगत भिसे त्‍याठिकाणाहून निघून गेली. थोड्यावेळानंतर भिसे पुन्‍हा त्‍याठिकाणी आली व तिने शिपाईपदासाठी नियुक्‍ती झाली असून त्‍याचा नेमणुक कालावधी सुरु होण्‍यास अवधी असल्‍याचे पुणे जिल्‍हाधिकारी यांच्‍यासहीचे पत्र हुंबेला दिले. यानुसार पुन्‍हा हुंबे हजर होण्‍यासाठी गेले असता, साहेब बाहेर आहेत असे सांगत भिसेने वैद्यकीय तपासणी अहवाल, सेवापुस्‍तिका व इतर बाबींची कागदपत्रे देत तशी तपासणी पुण्‍यातील गंजपेठेत असणार्‍या डॉ. भारत शहा यांच्‍याकडून करुन घेतली. 

भिसे वारंवार टाळाटाळ करु लागल्‍याने हुंबे यांना संशय आला. यानंतर त्‍यांनी विविध ठिकाणी चौकशी केली, असता देण्‍यात आलेली नियुक्‍तीपत्रे बनावट असल्‍याचे समोर आले. फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर हुंबे यांनी भिसेंकडे पैशासाठी तगादा लावला,मात्र तीने पैसे परत देण्‍यास नकार दिला. याप्रकरणी आकाश हुंबे यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात फसवणूकीची तक्रार नोंदवली. यानुसार अनिता भिसे हिच्‍यावर फसवणूकीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. 

फसवणूकीचे अनेक गुन्‍हे 
हुंबे यांनी भिसे यांच्‍याविषयी मंत्रालयात जावून चौकशी केली. चौकशीत भिसे हिने अनेकांना अशाच प्रकारे गंडा घातला असून त्‍याबाबतचे अनेक गुन्‍हे पुणे तसेच इतर पोलिस ठाण्‍यात दाखल असल्‍याची माहिती भिसे यांना मिळाली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in