या नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार - The coroner's body was cremated by the mayor of Karad wearing a PPE kit | Politics Marathi News - Sarkarnama

या नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्काराला पुढाकार घेतला. त्या स्वतः कोरोनाबाधितही होत्या. त्यांच्यासह पती व सर्वच कुटुंबीय बाधित असतानाही शिंदे अनेक कामात पुढे होत्या. शिंदे कोरोनामुक्त होऊन पुन्हा कोरोनाला रोखण्यासाठी मैदानात सक्रियपणे उतरल्या आहेत. कोरोना संकटात त्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कऱ्हाड : कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः पीपीई किट घालून चार
मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. पालिका कर्मचाऱ्यांचे मनोबलही वाढविले. 

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्काराला पुढाकार घेतला. त्या स्वतः कोरोनाबाधितही होत्या. त्यांच्यासह पती व सर्वच कुटुंबीय बाधित असतानाही शिंदे अनेक कामात पुढे होत्या. शिंदे कोरोनामुक्त होऊन पुन्हा कोरोनाला रोखण्यासाठी मैदानात सक्रियपणे उतरल्या आहेत. कोरोना संकटात त्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पहिल्यापासून त्या पालिका कर्मचाऱ्यांसोबत आहेत. दरम्यान, यापूर्वी कऱ्हाड पालिकेच्या रमाकांत डाके यांनी देखील पालिका कर्मचा-यांसमवेत सुमारे बारा कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार केले आहेत. बुधवारी सकाळीही त्यांनी चार कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्काराला पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना साथ दिली. सकाळी स्वतः पीपीई किट घालून चार कोरोना रुग्णांवर
अंत्यसंस्कार केले.

कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेच्या मुकादम मारुती काटरे, युवराज भोसले, परशुराम अवघडे, भगवान ढेकळे, राजेंद्र भोसले,
नागेश यादव, प्रल्हाद कांबळे, राहुल कांबळे, प्रवीण शिंदे, अशोक डाइंगडे, कुदंन लादे या पथकाला त्यांचा आधार वाटला. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य ही वाढले आहे. कोरोनाच्या संकटकाळात धाडसाने कर्तव्यातही पुढे राहणार आहे, हे नगराध्यक्षा शिंदे यांनी कृतीतून दाखविले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख