बिल न दिल्याने कोरोना रूग्णाचा मृतदेह तीन दिवस रूग्णालयातच

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना योगायोगाने हा धक्कादायक प्रकार आज समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी म्हणजे तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये धाव घेतली. सेंटर चालकांची त्यांनी खऱड़पट्टी काढल्यानंतर हा मतृदेह ते नातेवाईकांकडे देण्यास तयार झाले. घडल्या प्रकाराबद्दल बारणेंनी संताप व्यक्त केला.
बिल न दिल्याने कोरोना रूग्णाचा मृतदेह तीन दिवस रूग्णालयातच
Corona's body remained in the hospital for three days due to non-payment of bills

पिंपरी : मोफत उपचाराची सुविधा असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड रुग्णालयात बेडसाठी एक लाख रुपये कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून घेतल्याच्या संतापजनक घटनेची पुनरावृत्ती तळेगाव दाभाडे (ता.मावळ, जि.पुणे) येथे झाली आहे. बील न दिल्याने मायमर
मेडिकल कॉलेजच्या कोविड केअर सेंटरने कोरोना मृतदेह तीन दिवस ताब्यात न देता कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी
केला आहे.  

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना योगायोगाने हा धक्कादायक प्रकार आज समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी म्हणजे तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये धाव घेतली. सेंटर चालकांची त्यांनी खऱड़पट्टी काढल्यानंतर हा मतृदेह ते नातेवाईकांकडे देण्यास तयार झाले. घडल्या प्रकाराबद्दल बारणेंनी संताप व्यक्त केला. 

जनसेवा प्रतिष्ठानने सुरू केलेल्या मोफत अन्न छत्राला भेट देण्यासाठी आज ते तळेगावला गेले होते. तिथे त्यांना हा प्रकार समजला. कोरोनाने मरण पावलेल्या गणेश लंकेच्या मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह बिल न दिल्याने न देता अडवून ठेवला असल्याची तक्रार बारणेंकडे केली. त्यानंतर बारणेनी मायमर कॉलेजच्या प्रमुख डॉ. सुचित्रा नांगरे यांच्याशी चर्चा केली. कोरोनाचा मृतदेह पैशांसाठी तीन ते चार दिवस ठेवणे अतिशय चुकीचे आहे. 

पैशासाठी छळवणूक करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरणे संतापजनक असल्याचे खडेबोल त्यांनी सुनावले. मृत्यू झालेल्या लोके यांच्या घरातील चारजण पॉझिटिव्ह आहेत. तक्रार करणारा व बिलाच्या पैशाची सोय करण्यासाठी वणवण फिरणारा मृत लोकेंचा मुलगा, पण कदाचित पॉझिटिव्ह असू शकतो, याकडे त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले. या  खरडपट्टीनंतर रुग्णालय प्रशासन मृतदेह नातेवाईकांकडे देण्यास तयार झाले. काही हॉस्पिटलच्या लोकांनी कोरोनाचा धंदा केल्याची जळजळीत टीका बारणेंनी या प्रकारावर केली. 

तळेगांव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलजवळ मायमर मेडिकल कॉलेज आहे.  त्यांनी कॉलेजमध्ये २०० बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. येथे तीन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान गणेश लोके या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र, उपचाराचे बिल  दिले नसल्याने कॉलेजने मृतदेह देण्यास नकार दिला. त्यामुळे  पैसे जमा करण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू होती. त्याचदरम्यान,बारणे हे आज तळेगावात आल्याने त्यांची लोकेंच्या मुलाने घेतल्याने हा प्रकार समोर आला.दरम्यान, यासंदर्भात मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in