गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात मोठी फसवणूक - Case Registered Against Four For cheating Gayatridevi Pantapratinidhi In Vishrambag Police station in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात मोठी फसवणूक

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

याबाबत गायत्रीदेवीचे स्वीयसहायक बलराज अरुण वाडेकर (वय ३७, रा. गुरुवार पेठ) यांनी पु्ण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट दस्तावेज तयार करुन आरोपींनी गायत्रीदेवीचे यांची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान गायत्रीदेवी यांना हा प्रकार समजला. ही घटना उघडकीस आली.

पुणे : औंध संस्थांनच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टीचा बनावट करारनामा करून खोट्या सह्या करत ही फसवणूक केली आहे. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

याप्रकरणी शशी शंकर पोडवाल (वय ५१, रा. आळंदी रोड येरवडा), आसिफ जलिल खान (वय ६१, रा. मार्केटयाड), अन्वर युनूस खान पठाण (वय ५४, रा.
गोखलेनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत गायत्रीदेवीचे स्वीयसहायक बलराज अरुण वाडेकर (वय ३७, रा. गुरुवार पेठ) यांनी पु्ण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बनावट दस्तावेज तयार करुन आरोपींनी गायत्रीदेवीचे यांची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान गायत्रीदेवी यांना हा प्रकार समजला. ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वीयसहायक बलराज अरुण वाडेकर हे गायत्रीदेवी यांचे स्वीयसहायक आहेत. यामुळे सर्व्हे नंबर ४५८ /१ टिळकरोड, सदाशिव पेठ, पुणे येथील मिळकतीबद्दल आरोपी शशी पोडवाल याने प्रॉपर्टीचा पोट भाडेकरू आसिफ व अन्वर यांच्याशी संगनमत करून प्रॉपर्टीचा बनावट नोटराईज समझोता करारनामा केला. त्यानंतर गायत्रीदेवी व त्याच्या मुलांचे यावर फोटो लावून खोट्या (बनावट) सह्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

 या चौघांनी संगनमत करत बनावट दस्ताऐवज तयार करून तो खरा आहे, हे भासवत गायत्रीदेवी पंतप्रतीनिधी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पुण्यातील विश्रामबाग पोलिस करत आहेत.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख