गजा मारणे टोळीतील १३ जणांना वाईत अटक; जिल्हाबंदी आदेश मोडल्याने कारवाई - 13 members of Gaja Marane gang arrested; Action for breaking district ban order | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

गजा मारणे टोळीतील १३ जणांना वाईत अटक; जिल्हाबंदी आदेश मोडल्याने कारवाई

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे 13 जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी येथे जाऊन व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्‍यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या.

वाई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हाबंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 13 जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्व जण पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. यातील काही लोकांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्यांच्याकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत.

राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 13 जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी नाक्‍यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलिस तपासात पुढे आले. या प्रकरणात संबंधितांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू होते. उशीरापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. 

वाई येथील बिल्डर व पाचगणी येथील एका शाळेच्या चालकाशी संबंधित पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे 13 जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी येथे जाऊन व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्‍यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या. पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणले. 

त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्याकडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या 13 जणांतील अनेक जण गजा मारणे टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली. या सर्वांकडे कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. 

या दोघांनी संबंधित 13 जणांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे तोंडी सांगितल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान पुण्यातील पोलिस
अहवालाच्या प्रतीक्षेत उशीरापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र, त्यांच्यावर जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

गजा मारणेच्या संबंधाची चौकशी सुरू 

वाई पोलिसांनी ताब्यात घेतलेले 13 जण काही वसुलीच्या प्रकरणासाठी
जिल्ह्यात आले आहे. यातील काही जणांचा गजा मारणेच्या पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गजा मारण्याच्या टोळीचा काही संबंध आहे का, याची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख