मराठा आरक्षण आंदोलनात भाजप सहभागी होणार; आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणार

मराठा आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी काल (ता.१७) दिली.
BJP to participate in Maratha reservation movement
BJP to participate in Maratha reservation movement

पिंपरी : मराठा आरक्षण (Maratha Reservation) निकालावर फेर याचिका दाखल करण्याचा निर्णय केंद्रातील भाजप (BJP) सरकारने घेतल्यानंतर आता राज्यातील भाजपने त्यापुढील एक पाऊल टाकत आता मराठा समाजाच्या सर्व आंदोलनात सक्रियपणे उतरण्याचा ठरवले आहे. तसा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकताच एका खास बैठकीत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसह नेत्यांना दिला. त्यामुळे या आंदोलनात भाजप कार्यकर्ते उतरणार असल्याची पत्रके राज्यभरातील भाजप नेते व जिल्हाध्यक्षांकंडून निघाली आहेत. (BJP to participate in Maratha reservation movement)

पिंपरी-चिंचवड व मावळही त्याला अपवाद नाही. खरं, तर मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून डॅमेज कंट्रोल अपेक्षित होते. पण, भाजपने ही संधी घेत हुशारीने ही चाल खेळत महाविकास आघाडी सरकारवर वरकडी केली आहे. उद्या, जर सर्वोच्च न्यायालयाने फेरविचाराची याचिका जरी मान्य केली. तरी त्याचे भांडवल पक्षाला करता येणार आहे. त्याला बळ मिळावे, म्हणून भाजपने आता मराठा आरक्षण आंदोलनात उडी घेतल्याची जाणकारांत चर्चा आहे.

मराठा आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी काल (ता.१७) दिली. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असे त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तर, मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत मविआ सरकारने कच खाल्ल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी होईल, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आणि भाजपचे मावळचे माजी आमदार बाळाभाऊ भेगडे यांनी आज (ता.१८) एका निवेदनाद्वारे दिली. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भेगडे व लांडगे या दोघांच्याही निवेदनातील मजूकर सारखाच आहे. त्यात ते म्हणतात, आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असताना राज्य  सरकारने त्याच्या कायदेशीर लढाईत कुचराई करीत फडणवीस सरकारने दिलेल्या आरक्षणाचा मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com