शिवसेनेला धक्का : पारोळच्या ग्रामपंचायत सदस्या गीता पाटलांचा बविआमध्ये प्रवेश

हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात झाला.
Push to Shivsena: Parol Gram Panchayat member Geeta Patil enters BVA-ub73
Push to Shivsena: Parol Gram Panchayat member Geeta Patil enters BVA-ub73

विरार : पालघर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या जागेसाठी पाच ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेला मोठा धक्का बसला. पूर्वेकडील पारोळ ग्रामपंचायत सदस्या गीता गुरुनाथ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार राजेश पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष
राजेंद्र पाटील, माजी खासदार बळीराम जाधव यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. Push to Shivsena: Parol Gram Panchayat member Geeta Patil enters BVA

वसई पंचायत समितीच्या दोन जागांसाठी ही पोट निवडणूक होत असून या दोन्ही जागा पूर्वपट्टीतील असून दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे हा शिवसेनेला बसलेला मोठा धक्का समजला जात आहे.  येथील शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्या गीता गुरुनाथ पाटील यांच्या समवेत गुरुनाथ गजानन पाटील, सोनू पाटील, यांनी बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात झाला. यावेळी वसई विरार शहर महानगर पालिकेचे माजी सभापती कन्हैया भोईर, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी, बहुजन विकास आघाडीचे बाळू घरत, कृपेश पाटील, अशोक पाटील, भिणार चे माजी उपसरपंच रुपेश पाटील, मयुर कुडु, विशाल पाटील,वैभव जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com