Naseem Khan question Polise department Action Being Taken on Vehicles Carring Goats | Sarkarnama

बकरी ईदच्या वाहनांना का अडविता : नसीम खान यांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 30 जुलै 2020

 एकतर सरकारच्या नियमावलीचे पोलिस पालन करत नाहीत किंवा सरकार केवळ कागदोपत्री नियमावली करून शांत राहून तमाशा बघत आहे का, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने याविरोधात पाऊल उचलणे आवश्यक आहे, असेही नसीम खान यांनी म्हटले आहे.  

मुंबई : बकरी ईदसाठी शासनाने लागू केलेली नियमावलीचे पालन करताना मुस्लिम समाजाने ऑनलाइन पध्दतीने बकरी खरेदी केली आहेत. पण घरपोच बकरी देण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर पोलिस जबरदस्तीने कारवाई करत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते नसीम खान संतप्त झाले आहेत. त्यांनी एक तर सरकारच्या नियमावलीचे पोलिस पालन करत नाहीत किंवा सरकार केवळ कागदोपत्री नियमावली करून शांत राहून तमाशा बघत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

बकरी ईदच्या सणासाठी सरकारने कुर्बानीची नियमावली जाहिर केली आहे. सध्या लॉकडाउन असल्याने या काळात बकऱ्यांचा बाजार भरणार नाही, असे स्पष्ट करून कुर्बानीसाठी बकरी ऑनलाईन खरेदी करावीत, असे म्हटले आहे.

त्यानुसार सरकारची सूचना मानून काही मुस्लिम समाजाने विविध ठिकाणच्या फार्म हाऊसवरून ऑनलाइन पध्दतीने बकरी खरेदी केली आहे. ही ऑनलाइन बकरी घरपोच द्यायला हे फार्म हाऊसवाले शहराकडे येत आहेत. पण त्यांच्यावर दहिसर, कसारा, खर्डी, शहापूर, कल्याण येथील तपासणी नाक्यावर पोलिस त्यांच्यावर जबरदस्ती कारवाई करत आहेत. बकरी घरपोच देण्यासाठी आलेल्या वाहनांना विनाकारण तीन तीन दिवस थांबवून ठेवले आहे. हजारो बकरे मेले आहेत. काही बकरी पोलिसांनी परत पाठविली आहेत. पोलिस जबरदस्ती कारवाई करत असल्याबाबत राज्यातील अनेक ठिकाणाहून आमच्याकडे तक्रारी येत आहेत.

राज्य सरकारने बकरी ईदसाठी बनविलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.  एकतर सरकारच्या नियमावलीचे पोलिस पालन करत नाहीत किंवा सरकार केवळ कागदोपत्री नियमावली करून शांत राहून तमाशा बघत आहे का, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने याविरोधात पाऊल उचलणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. अशातच काँग्रेसच्याच नेत्यांकडून सरकारने बकरी ईदच्या निमित्ताने राबविलेल्या नियमावलीवरून टिका केली जात आहे. 
   

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख