माथाडी मंडळ नियुक्तीत नरेंद्र पाटलांचे नाव वगळले; संघटना आक्रमक, मुख्यमंत्र्यांना निवेदन - Narendra Patil's name omitted in Mathadi Mandal appointment; Organization aggressive, statement to CM | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माथाडी मंडळ नियुक्तीत नरेंद्र पाटलांचे नाव वगळले; संघटना आक्रमक, मुख्यमंत्र्यांना निवेदन

राजेश पाटील
बुधवार, 14 एप्रिल 2021

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट युनियनच्या सरचिटणीस या प्रमुख पदावरील माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव वगळल्याने माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. अशाप्रकारे शासनाकडून संघटनेच्या पदाधिका-यांमध्ये संभ्रम निर्माण होणारी कृती झाल्यामुळे त्याचा संघटनेच्या कामकाजावर तसेच कामगारांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात नमूद आहे.

ढेबेवाडी : महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट युनियनच्या सरचिटणीस या प्रमुख पदावरील माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव वगळल्याने माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या प्रमुख नेत्यांना डावलून कामगारांशी संबंध नसलेल्या व्यक्तींची माथाडी मंडळावर सदस्य म्हणून नेमणुक करण्याचा घाट राज्य शासनाच्या कामगार विभागाने घेतला आहे.

हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा. तसेच माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या संघटनेच्या प्रमुख पदावरील नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करावी, अन्यथा माथाडी कामगारांना आंदोलनाचा पावित्रा घेणे भाग पडेल, असा इशारा माथाडी युनियनने दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री यांच्यासह कामगार विभाग व माथाडी मंडळाना देण्यात आले आहे.

माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या एकूण कामगारांपैकी नव्वद टक्के माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सभासद आहेत. त्यांचे प्रतिनिधीत्व ही संघटना करीत आहे. माथाडी बोर्डाच्या स्थापनेपासून त्रिपक्षिय माथाडी मंडळाची रचना करताना पूर्वीपासून या संघटनेच्या सरचिटणीस व इतर पदावरील प्रतिनिधींची मंडळावर सदस्य म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. 

मात्र, गेल्या काही दिवसापासून माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या मालक अथवा कामगारांशी कसलाही संबंध नसलेल्या व्यक्तींची मंडळांवर सदस्य म्हणून नेमणुक केली जात आहे. त्यामुळे मंडळातील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात धोरणात्मक निर्णय होत नाहीत. अशा व्यक्तींना माथाडी कामगार, मालक व मंडळाच्या कामकाजाबद्दल माहिती नसल्यामुळे चांगले निर्णय घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट युनियनच्या सरचिटणीस या प्रमुख पदावरील माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव वगळल्याने माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. अशाप्रकारे शासनाकडून संघटनेच्या पदाधिका-यांमध्ये संभ्रम निर्माण होणारी कृती झाल्यामुळे त्याचा संघटनेच्या कामकाजावर तसेच कामगारांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात नमूद आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख