जयंत पाटलांचा पंतप्रधानांवर निशाणा ! ...तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय

अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असेम्हटलेजात असेल, तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवे,याचा विचार मी करतोय !
Jayant Paitl.jpg
Jayant Paitl.jpg

मुंबई : आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच, हे जयंतराव पाटील यांचं वाक्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारच्या कोरोना काळातील कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या कौतुकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Jayant Patil targets PM! ... so I wonder how much Maharashtra should be appreciated)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये योगी सरकारने अभूतपूर्व काम केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने चांगले काम केलं आहे, अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावर 'उत्तरप्रदेशची परिस्थिती काय होती, याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली.

अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असे म्हटले जात असेल, तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवे, याचा विचार मी करतोय !' असे म्हणत जयंतराव पाटील यांनी मोदींना टोला लगावला आहे.

हेही वाचा..

इंधन दरवाढी विरोधात काॅंग्रेसची सायकल रॅली

श्रीरामपूर : काॅंग्रेसच्या राज्यव्यापी इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात जनआंदोलनाचे पडसात श्रीरामपूरात देखील उमटले. येथील काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) सकाळी येथील प्रमुख रस्त्यावरुन सायकल रॅली काढुन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी दिल्या.

केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची दरवाढ केली. परिणामी, कोरोनाच्या संकटातुन सावरताना महागाईचा भडका उडाल्याने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनले आहे. याचा निषेध नोंदवीत येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने सायकल रॅली काढुन इंधन दरवाढीचा निषेध केला.

शहरातील बेलापूर रस्त्या समोरील यशोधन कार्यालय येथून सायकल रॅलीला सकाळी प्रारंभ झाला. त्यानंतर रॅली शिवाजी रोड, शिवाजी चौक, गांधी चौक, मेनरोड मार्गे बेलापूर रस्त्यावरील ओझा पेट्रोल पंपासमोर पोहचली. रॅलीत सहभागी झालेल्या काॅंग्रेसच्या आंदोलकांनी पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात घोषणा देत केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध नोंदवुन रॅलाचा समोरोप केला.

आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅलीत काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्यांनी मोठ्या संख्यने सहभाग नोंदविला.
त्यानंतर प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीसमोर पंचायत समितीच्या सदस्या डाॅ. वंदना मुरकुटे व दिपाली करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसच्या महीला कार्यकर्त्यांनी ग्रॅसच्या दरवाढी विरोधात घोषणा देवुन केंद्र सरकाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

या वेळी काॅंग्रेसच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. याप्रसंगी काॅंग्रेसचे जेष्ठनेते इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, बाबासाहेब दिघे, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, शशांक रासकर, आशिष धनवटे, राजेंद्र पाऊलबुधे, सतीष बोर्डे, अशोक पवार, अभिजीत लिप्टे, सुभाष तोरणे, रितेश रोटे, विजय बोर्डे यांच्यासह आदी उपस्थित होते.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com