पावसाळ्यात मुंबईच्या झोपड्यांमधील बळी हे शिवसेनेचे पाप; महापालिका निवडणूकीत कठोर शिक्षा द्या....

शहरातील यासंबंधीची कामे करणारे कंत्राटदार व शिवसेनेचे कारभारी यांची मिलीभगतही सर्वांनाच ठाऊक आहे. याच हितसंबंधातून कारभाऱ्यांना मलई मिळते व नागरिकांच्या नशिबी खड्डे पडलेले रस्ते आणि तुंबलेली मुंबई येते.
It is the sin of Shivsena to fall victim to slums in Mumbai during monsoons; Give severe punishment in municipal elections ....
It is the sin of Shivsena to fall victim to slums in Mumbai during monsoons; Give severe punishment in municipal elections ....

मुंबई : शहरातील डोंगरांवर, खाजण जमिनीत झोपडपट्ट्या फोफावण्यास, गेली पंचवीस वर्षे महापालिकेत सत्ता असलेली शिवसेनाच जबाबदार आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात अपघातांमुळे झोपड्यांमध्ये जाणारे बळी हे शिवसेनेचे पाप असून याबद्दल नागरिकांनी शिवसेनेला येत्या महापालिका निवडणुकीत कठोर शिक्षा द्यावी, असे आवाहन भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. It is the sin of Shivsena to fall victim to slums in Mumbai during monsoons; Give severe punishment in municipal elections ....

काल (रविवारी) मुंबईत तुफानी पावसाने झोपड्यांवर दरडी आणि संरक्षक भिंती कोसळून 31 जण मृत्युमुखी पडले. त्या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी ही टीका केली आहे. शहरात झोपड्यांची वाढ न होण्याची आणि त्या रहिवाशांसाठी शहरात सन्मानाने जगण्याची व्यवस्था करणे हे शिवसेनेचे कर्तव्य होते. मात्र मतांसाठी त्यांनी ते पार पाडले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

मुळात झोपड्यांची वाढ थांबवणे हे तर शिवसेनेच्याच हातात होते. तसेच झोपड्यांमधील नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी सरकारवर दडपण  आणण्याचे प्रयत्न शिवसेना करू शकली असती. मात्र वाटेल तेथे अनिर्बंध झोपड्या उभारल्या जात असताना मतांसाठी शिवसेनेने त्याकडे कानाडोळा केला. शहरावर पंचवीस वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या सर्व काळात जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी त्यांचेच होते. याच काळात मुंबईत वेगाने झोपड्या फोफावत गेल्या, त्याला कोणा लोकप्रतिनिधींचा `अर्थ`पूर्ण पाठिंबा होता हे उघड गुपित आहे, असेही लाड म्हणाले. 

दर पावसाळ्यात तुंबणारी मुंबई तसेच रस्त्यांवर पडणारे खड्डे याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. शहरातील यासंबंधीची कामे करणारे कंत्राटदार व शिवसेनेचे कारभारी यांची मिलीभगतही सर्वांनाच ठाऊक आहे. याच हितसंबंधातून कारभाऱ्यांना मलई मिळते व नागरिकांच्या नशिबी खड्डे पडलेले रस्ते आणि तुंबलेली मुंबई येते.

यातून नागरिकांच्या रागाचा स्फोट आपल्यावर होऊ नये, म्हणून मधेच कधीतरी कंत्राटदाराच्या वृद्ध, गरीब कर्मचाऱ्याला थोबाडीत मार, त्याला कचऱ्याने अंघोळ घाल असे प्रकार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करतात. वास्तविक हे कंत्राटदार हे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे मित्रच असतात. या कंत्राटदाराला हात लावण्याची त्यांची हिंमत नसते, म्हणून कंत्राटदाराच्या गरीब कर्मचाऱ्यांसमोर अशी नाटके केली जातात, अशीही टीका लाड यांनी केली आहे. या सर्व नाटकांचा पर्दाफाश मतदारांनी येत्या निवडणुकीत करावा, असेही लाड यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com