कऱ्हाडच्या डीवायएसपींसह कुटुंबातील चौघांना कोरोनाचा संसर्ग - Four members of the family, including Karad's DYSP Tested corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

कऱ्हाडच्या डीवायएसपींसह कुटुंबातील चौघांना कोरोनाचा संसर्ग

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

कऱ्हाडचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील अन्य दोन कर्मचारीही बाधित झाले आहेत. कऱ्हाड तालुक्यातील आणखी चार पोलिस अधिकारी, 41 हवालदार तर गृहरक्षक दलाचे 10 जवानही बाधित झाले आहेत. कोरोनाचा कऱ्हाड तालुका व शहरात कहर वाढला आहे. कोरोना योद्धांनाही कोरोनाच्या कचाट्यात अडकावे लागत आहे. 

कऱ्हाड : पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील चौघेजण कोरोनाबाधित आढळल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षक
कार्यालयातील कामाकाजात विस्कीळीतपणा आला असून अनेक महत्वाची कामे ठप्प झाली आहेत. 

कऱ्हाडचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील अन्य दोन कर्मचारीही बाधित झाले आहेत. कऱ्हाड तालुक्यातील आणखी चार पोलिस
अधिकारी, 41 हवालदार तर गृहरक्षक दलाचे 10 जवानही बाधित झाले आहेत. कोरोनाचा कऱ्हाड तालुका व शहरात कहर वाढला आहे. कोरोना योद्धांनाही कोरोनाच्या
कचाट्यात अडकावे लागत आहे.

आजअखेर तालुक्यात तब्बल 300 कोरोना योद्धे बाधित झाले आहेत. त्यात आरोग्य विभाग व पोलिस दलातील कोरोनाबाधित सर्वाधिक आहेत. आरोग्य खात्यापेक्षाही पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांचीही काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. श्री. गुरव यांच्यासह त्यांच्या घरातील चार सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कऱ्हाडच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी श्री. गुरव यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. तिचा अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांनाही
कोरोनाची बाधा होवू लागली आहे. यापूर्वी येथील उपजिल्हा रूग्णलायाचे वैद्यकीय अधीक्षकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसह
रूग्णालयातील 25 जणांना कोरोनाने ग्रासले आहे. पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव वेगाने होऊ लागला आहे. यामध्ये चार अधिकारी, 41 पोलिस कर्मचारी व 10
गृहरक्षक दलाच्या जवानांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख