Corona : Kalyan, Dombivali including Thane closed for ten days from today | Sarkarnama

कोरोना इफेक्ट : ठाणेसह कल्याण, डोंबिवली आजपासून दहा दिवस बंद

विकास काटे
गुरुवार, 2 जुलै 2020

पोलिसांनी आज सकाळपासूनच चोख आणि कडक बंदोबस्त लावला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच शहरात जाण्यासाठी परवानगी मिळत आहे. पोलिसांकडून कल्याणमध्ये ठीक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच सकाळपासून या परिसरातील एकही दुकान उघडलेले नाही.

ठाणे : कोरोनाची साखळी तुटावी यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने १२ तारखेपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. ठाणे शहरातून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांनी घरीच थांबावे व पोलिस, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

ठाण्यात आज पासून लॉक डाऊन ला सुरुवात झाली आहे..त्या मुळे शहरातून मुंबईच्या दिशेने जाणारे हायवे वर पोलिसांनी बंदोबस्त लावून कारवाईस सुरुवात केली आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे शहर व परिसरात आजपासून (ता. 2 ) ते 12 जुलै पर्यंत ठाणेसह कल्याण, डोंबिवलीमध्ये लोकडाउनला सुरुवात झाली आहे.

पोलिसांनी आज सकाळपासूनच चोख आणि कडक बंदोबस्त लावला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच शहरात जाण्यासाठी परवानगी मिळत आहे. पोलिसांकडून कल्याणमध्ये ठीक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच सकाळपासून या परिसरातील एकही दुकान उघडलेले नाही. कल्याण डोंबिवलीमधील स्टेशन परिसरातील अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद केली आहेत.

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिस कारवाई करत असल्यामुळे रस्त्यावर देखील रहदारी कमी आहे. विनाकारण रस्त्यावर फिरल्यास पोलीस कारवाईला समोर जाणार असल्याचे पोलिसांकडून वारंवार अनऊसमेंट द्वारे नागरिकांना सूचित करण्यात येत आहे. यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर देखील पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख