''काळुबाई'' च्या सेटवर कोरोनाचा संसर्ग; अभिनेत्री आशालता वाबगावकरांची प्रकृती चिंताजनक 

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. सध्या त्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री अलका कुबल या थांबून आहेत. या मालिकेच्या निर्मात्याही त्याच आहेत. खानविलकर फार्महाऊसचा सर्व परिसर सध्या सील करण्यात आला आहे.
Actress Ashalata Wabgaonkar
Actress Ashalata Wabgaonkar

सातारा : साताऱ्यातील खानविलकर फार्म हाऊसवर चित्रिकरण सुरू असलेल्या ''माझी आई काळुबाई'' या मालिकेच्या सेटवरील तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या मालिकेत महत्वाची भूमिका करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. मुंबईहून काही कलाकार साताऱ्यात चित्रीकरणासाठी आले होते, त्यातूनच हा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. 

''आई माझी काळूबाई'' ही मालिका लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सुरू झाली. या मालिकेत प्राजक्ता गायकवाड, अलका कुबल, आशालता वाबगावकर यांच्या मुख्य भुमिका आहेत. या मालिकेतील गाण्यांचे चित्रीकरण साताऱ्याजवळ असलेल्या खानविलकर फार्महाऊसवर सुरू होते. त्यासाठी काही मंडळी मुंबईतून आली होती. तिथे या कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

तब्बल 27 कलाकारांना संसर्ग झाला होता. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. सध्या त्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री अलका कुबल या थांबून आहेत. या मालिकेच्या निर्मात्याही त्याच आहेत. खानविलकर फार्महाऊसचा सर्व परिसर सध्या सील करण्यात आला आहे.

साताऱ्यातील चित्रीकरण थांबवून ते मुंबईला हालविण्यात आले आहे.  यापुढील चित्रीकरण फिल्मसिटीमध्ये होणार आहे.  मुंबईत कोरोनाचा संसर्ग जास्त असल्याने मुंबई बाहेर चित्रीकरण करण्याचा पर्याय निवडला होता. या मालिकेसाठी सातारा शहराचा परिसर निवडण्यात आला होता. तिथे सर्व उत्तम रितीने चित्रीकरण सुरू असताना, एका गाण्याचा चित्रीकरणासाठी मुंबईहून काही डान्सर्स आले होते. त्यांची कोव्हिड चाचणी न झाल्याने हा प्रकार झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. 

 अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या, ''सेटवर कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे लागण झालेली सगळीच मंडळी आता त्यातून बाहेर येत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांना मात्र, रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com