लाज बाळगा आणि बीकेसी कोविड सेंडर सुधारा : आम्हाला वेडवाकडं करायला लावू नका!

डेरे घाबरत असतील किंवा डेरेंचा गैरसमज झाला असेल तर नवाब मलिकांनी सांगावे त्यांना मुळात तो माणूस कोणाचा आहे याचाशी आमचे काही देणे घेणे नाही. तिथे जे डॉक्टर असायला पाहिजेत त्यांनी ते डॉक्टर पुरवले पाहिजेत एवढीच मागणी असून मृत्यूंचा डेथ रेट आहे तो कमी झाला पाहिजे, असेही मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
Be ashamed and improve BKC Kovid Center says Manse Leader Sandip Deshpande
Be ashamed and improve BKC Kovid Center says Manse Leader Sandip Deshpande

मुंबई : गोरेगाव कोविड सेंटरचे (Covid Center) दोन वेळा उद्घाटन केलं, मात्र ते अजून सुरू झालेलं नाही, उद्घाटन करण्याची घाई दिसते. मुंबईत (Mumbai) अनेक डॉक्टर बाहेरच्या राज्यातून आणण्यात आले आहेत. जो माणूस बीकेसी (BKC) कोविड सेंटरला डॉक्टर पुरवू शकला नाही. मग त्यालाच का कंञाट दिलं. कुठे आर्थिक हितसंबध आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून बीकेसी कोविड सेंटरची परिस्थिती एका आठवड्यात सुधारली नाही तर मनसे (Manse) स्टाईल धरणे आंदोलन करु, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी सरकार आणि मुंबई पालिकेला दिला आहे. Be ashamed and improve BKC Kovid Center says Manse Leader Sandip Deshpande

पालिका आणि सरकारच्या कोविड सेंटरमधील गलथान कारभारावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका केली. ते म्हणाले, ''आठवडाभर हात जोडून विनंती करतोय. जोडलेले हात सोडायला लावू नका. ज्या कामगारांना कामावरून काढले आहे त्यांची माफी मागितली पाहिजे. तुमचे चुकीचे धंदे जर कोण सांगत असेल तर त्याला तुम्ही कामावरून काढणार का? मग त्यांनी लोकांचा कुठे मृत्यू होतोय त्याबद्दल बोलायचे नाही.

डेरेंना आणि कॉन्ट्रेक्टर्सला सांगतोय पुढच्या सोमवारपर्यंत वेळ देतोय झालेल्या चुका त्यांनी पुन्हा तपासाव्यात नाही तर जम्बो कोव्हिड सेंटरच्या बाहेर धरणे आंदोलन करु. आम्हाला राजकारण करायचे नाही, म्हणून आम्ही आठवड्याभराची मुदत देतोय, असा इशारा त्यांनी मुंबई पालिकेला दिला आहे. ''जोपर्यंत ही परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करु. आठवड्याभरात डॉक्टरांची नेमणूक करावी तसेच या सर्व प्रश्नांवर आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पण तयार आहोत.

आम्हाला त्या ठिकाणी हंगामा आणि गोंधळ घालयचा नाही. पण, ते सुधारणार नसतील तर आम्हाला तेही करावे लागेल. डॉ. डेरांना नम्रतापूर्वक सांगतो, आम्हाला वेड वाकडं करायचे नाही. त्यामुळे डॉक्टर असल्याची लाज बाळगा, घेतलेली शप्पथ आठवा आणि पेशंट्सना बरे करण्याचे काम करा, त्यांना मृत्यूचा खाईत लोटून नका. असे धमकी वजा आवाहनही पालिकेला केले आहे.

''दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्या पेशंटच्या इथे कॅमेरे लावले आहेत. परंतु आपल्या पेशंटसोबत काय होतंय, हे बाहेरच्या लोकांना कळतं नाही. त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेरांचा ॲक्सेस रुग्णांचा नातेवाईकांना द्यावा. जेणेकरून आतमध्ये काय सुरु आहे, हे त्यांना कळेल अशी महत्त्वाची मागणी आहे. यासंदर्भातील पत्र मनसेचे अखिल चितळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. डेरेंनाही दिले आहे. या पत्राचा सोमवारपर्यंत विचार करावा, असेही देशपांडे म्हणाले.

वारंवार सांगून त्यांची गेंड्याची कातडी असेल तर त्यांना चपलेने मारायचे तर कशाने मारायचे. लोकांचा जीवाशी, मृत्यूशी खेळत असाल आणि का तर तो कॉन्ट्रेक्टर नवाब मलिकांचा जवळचा म्हणून त्याला तुम्ही अभय देणार आहेत का? नवाब भाईंनी घोटाळा केला असे मी कुठे बोलतोय. पण जर डॉ. डेरे असे म्हणत असतील की हा कॉन्ट्रॅक्टर नवाब मलिकांचा आहे. म्हणून मी कारवाई करु शकत नाही.

तर नवाब भाईंनी सांगावे डेरेंना कारवाई करायला. डेरे घाबरत असतील किंवा डेरेंचा गैरसमज झाला असेल तर नवाब मलिकांनी सांगावे त्यांना मुळात तो माणूस कोणाचा आहे याचाशी आमचे काही देणे घेणे नाही. तिथे जे डॉक्टर असायला पाहिजेत त्यांनी ते डॉक्टर पुरवले पाहिजेत एवढीच मागणी असून मृत्यूंचा डेथ रेट आहे तो कमी झाला पाहिजे, असेही मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com