`कोणाचा `बाप` काढण्याची माझी संस्कृती नाही` - "Baap War" between NCP leader and Chandrakant Patil on Twitter | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

`कोणाचा `बाप` काढण्याची माझी संस्कृती नाही`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

बाप या शब्दावरून निर्माण झालेल्या वादावर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू झालेले वाक् युद्ध आता टोकाला गेले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील बाप वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. तर, चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवरून राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले होते. आता या साऱ्या वादावर चंद्रकांतदादांनी स्पष्टीकरण दिले आहे.

बाप काढण्याची माझी संस्कृती नाही...
कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले, ''बाप'' या शब्दावरून मराठी भाषेत काही वाक्‍य प्रचार, म्हणी आहेत. त्यांचा बोलताना उपयोग केला तर कोणाचा बाप काढला असा अर्थ होत नाही. पुणे महापालिकेत आमचे सदस्य अधिक आहेत. त्या अर्थाने मी बाप असा शब्दप्रयोग केला. अजित पवारांच्या वडिलांचा उल्लेख करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बाप काढण्याची माझी संस्कृती नाही. केंद्रातील नेत्यांना कोणी बाप म्हणणारे आहे का? असे शशिकांत शिंदे म्हणाले, त्यांना देशातील 130 कोटी जनता बाप मानते. असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना 'आम्ही तुमचे बाप आहोत,' अशा भाषेत टिप्पणी केली होती. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संपात व्यक्त करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ट्विट करताना, 'सारखं सारखं बाप काढू नका. तुमच्या दिल्लीतल्या बापाला बाप म्हणायला वारसदार पण नाही.' अशी टीका केलीय. 

महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने सुरू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? असा प्रश्नही शशिंकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनीही यासाठी ट्विटरचा आधार घेतला. त्यात चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, आमची आई आणि बाप हे दोन्हीही जनताच आहे. दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे. तुम्ही सुद्धा पाहिलंय, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख