सत्तेसाठी शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली काम करते : गोवर्धन शर्मा

संपूर्ण देशभर धार्मिकस्थळे सुरू करण्यात आली असताना महाराष्ट्रात मात्र, मंदिरे बंद ठेऊन वारकरी व भाविकांचा अंत महाविकास विकास आघाडी बघत आहे. संत, वारकरी संप्रदाय तसेच सर्वसामान्य भाविकांची परीक्षा सरकारने घेवू नये, अन्यथा सरकारला ही बाब महागात पडेल, असा इशारा आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला आहे.
Shivsena works under pressure from Congress for power Says MLA Govardhan Sharma
Shivsena works under pressure from Congress for power Says MLA Govardhan Sharma

अकोला : धार्मिकस्थळांच्या मुद्द्यावर अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी शिवसेनेला ''टार्गेट'' केले आहे. हिंदूत्वाच्या नावाखाली मतं मागणारी शिवसेना सत्तेसाठी मात्र, काँग्रेसच्या दबावाखील काम करत असल्याचा आरोप आमदार शर्मा यांनी केला आहे.

कोरोना संकटामुळे मार्चपासून बंद असलेली धार्मिकस्थळे भाविकांसाठी ऑक्टोबरमध्ये खुली करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याची मागणी श्री. रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

कोरोनाचा कहर वाढतच असल्याने मंदिरे व धार्मिकस्थळे बंद ठेवण्यात आली होती. केंद्र शासनाने अनलॉक तीन व चारमध्ये नियमांचे पालन करून धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून धार्मिकस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता येत्या एक ऑक्टोबरपासून अनलॉक पाचची नियमावली जाहीर करताना त्यात धार्मिकस्थळे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.

संपूर्ण देशभर धार्मिकस्थळे सुरू करण्यात आली असताना महाराष्ट्रात मात्र, मंदिरे बंद ठेऊन वारकरी व भाविकांचा अंत महाविकास विकास आघाडी बघत आहे. संत, वारकरी संप्रदाय तसेच सर्वसामान्य भाविकांची परीक्षा सरकारने घेवू नये, अन्यथा सरकारला ही बाब महागात पडेल, असा इशारा आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com