नागपूर महापालिकेने मुख्यमंत्र्यांना कशासाठी मागितले ५०० कोटी ?

नागपूर शहर उपराजधानीचे शहर आहे. हा विचार करून अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनातर्फे ५०० कोटींचे विशेष आर्थिक साहाय्य देऊन शहराच्या विकासात हातभार लावावा
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

नागपूर : कोरोनाशी दोन हात करताना महानगरपालिका आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे पालिकेचे आर्थिक स्त्रोतही कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या उपाययोजना आणि इतर कामे करण्यासाठी चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकेला ५०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणी नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती विजय झलके यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्रही दिले आहे. 

सभापती झलके यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, कोविड-१९ च्या वाढत्या संक्रमणामुळे मनपाच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. पाणी कर, मालमत्ता कर व अन्य स्रोतांद्वारे येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधाही बळकट करण्यावर नागपूर महानगरपालिकेचा भर आहे. नागपूर शहर उपराजधानीचे शहर आहे. हा विचार करून अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनातर्फे ५०० कोटींचे विशेष आर्थिक साहाय्य देऊन शहराच्या विकासात हातभार लावावा, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून सभापती विजय झलके यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com