who made the threatening call to minister uday samant | Sarkarnama

कुणी केला मंत्री उदय सामंत यांना धमकीचा काॅल ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जिद्दीला पेटला आहे. कुठल्याही मुद्यावरून सरकारला नामोहरम करण्याचे प्रयत्न सातत्याने केले सुरू आहेत. मंत्री सामंतांना धमकीचा फोन म्हणजे त्यातलाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 

नागपूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. येथे काल बोलताना त्यांनी मराठा आरक्षण आणि विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात परखड मते मांडली. दरम्यान आज त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर त्यांना धमकी देणार कॉल आला. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्याने हा कॉल केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावर ‘पोकळ धमक्यांना घाबरत नाही’, असे उत्तर मंत्री सामंत यांनी दिले आहे. 

या सगळ्या घडामोडींवरून भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष चांगलाच टोकाला गेल्याचे दिसते. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही धमकीचा फोन आला होता. आज ते अमरावतीला गेले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात त्यांनी आढावा बैठक घेतली. मंत्री सावंत यांच्या पीएच्या मोबाईलवर कॉल आला. त्यावर त्यांना धमकी देण्यात आली. त्यावर पोकळ धमक्यांना घाबरत नाही, विद्यार्थ्यांच्या हिताची कामे करतच राहणार, असा विश्‍वास श्री सामंत यांनी व्यक्त केला. या धमकीची ते तातडीने तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

मंत्री सामंतांच्या तक्रारीनंतर त्यांना धमकावणारा कोण आहे, हे कळणार आहे. पण महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष येवढ्या टोकाला पोचला की मंत्र्यांना धमक्या देण्यापर्यंत कामे केली जात आहेत. महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जिद्दीला पेटला आहे. कुठल्याही मुद्यावरून सरकारला नामोहरम करण्याचे प्रयत्न सातत्याने केले सुरू आहेत. मंत्री सामंतांना धमकीचा फोन म्हणजे त्यातलाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख