रात्री उशिरा झाल्या राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने काल रात्री याबाबतचे आदेश दिले आहेत.
Police Logo
Police Logo

नागपूर : हो, नाही.. म्हणता म्हणता काल रात्री उशिरा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. अनेक दिवसांपासून या बदल्यांची प्रतीक्षा अधिकाऱ्यांना होती. नागपूर शहराला पाच नवीन पोलिस उपायुक्त मिळाले आहेत. पोलिस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही यामध्ये समावेश आहे. प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षेत असलेल्या १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली आहे. 

राज्य पोलिस दलातील पोलिस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नागपूर शहराला नवीन पाच पोलिस उपायुक्त मिळाले आहेत. यामध्ये नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक नूरुल हसन, एसआरपीएफ जालना येथील अक्षय शिंदे,  एसआरपीएफ अमरावती येथील लोहित मतानी, पुणे लोहमार्गाचे अधीक्षक दीपक साकोरे आणि बसवराज तेली यांचा समावेश आहे. नागपुरातील विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांची महामार्ग सुरक्षा पोलिस दलाच्या पोलीस अधीक्षकपदी तर पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांची नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. 

ग्रामीणच्या अतिरिक्त अधीक्षक मोनिका राऊत यांची अकोला येथे बदली झाली आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने काल रात्री याबाबतचे आदेश दिले आहेत. आयपीएसपदी पदोन्नती मिळालेल्यांची नवे पुढीलप्रमाणे : एस. जी. वायसे पाटील, ए. एम. बारगळ, एन. टी. ठाकूर, एस. एल. सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डी. पी. प्रधान, एम. एम. मोहिते (शीला डी सैल), पांडुरंग पाटील, टी.सी दोशी, डी.बी पाटील, एस. एस. बुरसे, सुनीता साळुंखे- ठाकरे, एस. एन.परोपकारी, एस. एस. घारगे, रवींद्रसिंग परदेशी आणि पुरुषोत्तम कराड यांची निवड झाली. हे सर्वजण गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते.              (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com