‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’च्या विरोधात ‘हे’ करणार राज्यव्यापी संप

तीन दिवसीय लाक्षणिक संप 28 सप्टेंबर पासूनच करू अशी तातडीची संपाची नोटीस ही देण्याचे ठरवले आहे. तशी संपाची नोटिस आपण सर्व पातळीवर म्हणजे दिनांक २३ सप्टेंबरला जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर, आरोग्य केंद्र, नगर व महानगरपालिका स्तरावर देणार. सदर कार्यक्रम अमलात आणण्याकरिता व शासनास आपले प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी भाग पाडू.
Maze Kutumb
Maze Kutumb

नागपूर : कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी सरकारने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना राज्यभर राबविण्याचे ठरविले. त्यासाठी आशा गटप्रवर्तकांना कामाला लावले. पण कुठल्याही सुविधा किंवा सुरक्षा साधने पुरविण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनतर्फे २३ तारखेला काळ्या फिती लावून सकाळी ११ वाजता संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही उपाय न झाल्यास राज्यभर संप करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. 

सीआयटीयूतर्फे (सेंटर ऑफ युनियन ट्रेड युनियन) राज्य सरकारने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा कार्यक्रम १५ सप्टेंबर पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रभर आशा व गटप्रवर्तकांच्या प्रचंड उद्रेक व तक्रारी समोर येत आहेत. तिघांची टीम करून कुठेच कामास सुरुवात झालेली दिसत नाही, आरोग्य स्वयंसेवक दिला जात नाही व आशानाच ते त्यांच्या कुटुंबातील एकाचे नाव देण्याची जबरदस्ती करताना दिसत आहेत. तसेच त्यांचे मानधन देण्यासाठी पुष्कळ ठिकाणी नकार देताना प्रशासन दिसत आहे. सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांनी या बाबत कुठेच पुढाकार घेऊन आशांना मदत करताना दिसत नाहीत. 

उलट सर्वत्र जबरदस्ती व दबाव टाकून कामे लादली जात आहेत. सर्वत्र सुरक्षा साधनांचा अभाव असून कार्यक्रम राबविण्यासाठी बहुतांश साहित्य अद्यापही दिले गेलेले नाहीत. आशांकडे अँड्रॉईड मोबाइल नसताना व बहुतांश आशांना प्रशिक्षण नसताना रिर्पोटींग करण्यासाठी तगादा लावला जात आहे. गटप्रवर्तक टीमवर्क मध्ये सामील नसताना रिपोर्टींग काम व सर्वेक्षणाचे काम दिले आहे. तुटपुंज्या मानधनावर रोज ५० घरांचे सर्वेक्षण करणे म्हणजे 10 ते 12 तास कामं करून स्वतःची व कुटुंबातील सर्वांची पिळवणूकच करण्यासारखे आहे, म्हणून कृती समिती मार्फत या बाबत आज शासनास पत्र लिहून जाब विचारण्याचे ठरवले आहे. येत्या २३ तारखेला काळ्या फिती लावून सकाळी ११ वाजता संविधान चौक, नागपूर येथे आंदोलनं करणार. तसेच 23 तारखे पासून काळ्या फिती लावून जमेल तेवढेच काम करण्याचे व शासनाने तातडीच्या या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास येत्या 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यभर संप पुकारण्यात येणार आहे. 

तीन दिवसीय लाक्षणिक संप 28 सप्टेंबर पासूनच करू अशी तातडीची संपाची नोटीस ही देण्याचे ठरवले आहे. तशी संपाची नोटिस आपण सर्व पातळीवर म्हणजे दिनांक २३ सप्टेंबरला जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर, आरोग्य केंद्र, नगर व महानगरपालिका स्तरावर देणार. सदर कार्यक्रम अमलात आणण्याकरिता व शासनास आपले प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी भाग पाडू. शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर संपाचा इशारा सुद्धा देण्यात आला असून प्रीती मेश्राम महासचिव व राजेंद्र साठे अध्यक्ष यांनी म्हटले आहे.
 (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com