तुकाराम मुंढेंच्या प्रस्तावाला राधाकृष्णन यांचीही मान्यता, डॉ. गंटावारांना दिले प्रमोशन ! - radhakrishnan also approved the proposal of tukaram mundhe promotion given to gantawar | Politics Marathi News - Sarkarnama

तुकाराम मुंढेंच्या प्रस्तावाला राधाकृष्णन यांचीही मान्यता, डॉ. गंटावारांना दिले प्रमोशन !

राजेश चरपे
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

डॉ. गंटावार व त्यांच्या पत्नी एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. पत्नीच्या सेवा पुस्तिकेची मागणी केल्यानंतरही ती सभागृहाला उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्या मध्यप्रदेशात दुसऱ्याच नावाने काँग्रेसच्या नेत्या म्हणून वावरतात. काँग्रेसच्या नेत्यांसोबत असलेले फलकही दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेच्या सभागृहात झळकावले होते.

नागपूर : अख्खी महानगरपालिका ज्यांच्या निलंबनाची मागणी करीत होती, ते डॉ. प्रवीण गंटावार यांचे निलंबन तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी होऊ दिले नव्हते. त्यासाठी त्यांनी पालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांचा विरोध पत्करला होता. मुंढेंची येथून बदली झाल्यानंतर डॉ. गंटावारांवर कारवाई होईल, असा अंदाज बांधला जात होता. कारण महापौर संदीप जोशी यांनीही त्यांना निलंबित करण्याचे आदेश सभागृहात दिले होते. पण गंटावारांवर कारवाई करण्याऐवजी आरोग्य अधिकारी म्हणून त्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवून त्यांचे प्रमोशन केले. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. 

माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचे खासमखास समजल्या जाणाऱ्या गंटावारांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाला विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मान्यता दिल्याचे कळते. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सहायक आरोग्य अधिकारी (जनरल सर्जन) या पदावर कार्यरत गंटावार कार्यरत आहेत. मुंढे आयुक्त म्हणून आल्यानंतर ते अचानक प्रकाशझोतात आले. त्यांना कोव्हीडचे समन्वयक करण्यात आले होते. त्यांची वागणूक, नगरसेवकांना उद्धट उत्तर देत असल्याने महापौर संदीप जोशी यांच्यासह सर्वच नगरसेवक त्यांच्यावर नाराज होते. त्यांच्या उद्धट वागणुकीचा फटका ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनाही बसला होता. 

महापालिकेच्या सभेत गंटावार व त्यांच्या पत्नीचे गैरव्यवहार तिवारी यांनी चव्हाट्यावर आणले होते. महापौर जोशी यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतरच लाचलुचपत विभागाने त्यांच्या घरी धाड टाकली होती. ॲलेक्सिस इस्पितळात काही गुंडांना घेऊन त्यांनी धाड टाकल्याचाही संशय व्यक्त केला जातो. साहील सय्यदला याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

डॉ. गंटावार व त्यांच्या पत्नी एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. पत्नीच्या सेवा पुस्तिकेची मागणी केल्यानंतरही ती सभागृहाला उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्या मध्यप्रदेशात दुसऱ्याच नावाने काँग्रेसच्या नेत्या म्हणून वावरतात. काँग्रेसच्या नेत्यांसोबत असलेले फलकही दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेच्या सभागृहात झळकावले होते.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख