प्रफुल्ल पटेल म्हणाले, ही बाई शुद्धीत आहे की नाही..?

ट्विटर वॉरमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगणाच्या कानशिलात लावण्यासंदर्भात ट्विट करून या प्रकरणी पेटलेल्या आगीत आणखी तेल ओतले. याशिवाय भारतीय जनता पक्ष सोडला तर इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनीकंगणावर टिकेची झोड उठवली आहे.
Kangana Ranawat - Prafull Patel
Kangana Ranawat - Prafull Patel

भंडारा : अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात कंगणा राणावत बोलली. तिच्या वक्तव्यानंतर देशभराचा रोष तिने स्वतःवर ओढवून घेतला. काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल बोलताना तिला मुंबईच काय पण महाराष्ट्रातही कुठे राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत खडे बोल सुनावले. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही ‘ही बाई शुद्धीत आहे की नाही’, असे म्हणत कंगणा राणावतवर नाव न घेता हल्ला केला. 

प्रफुल्ल पटेल यांनी काल भंडारा जिल्ह्याच्या पुरग्रस्त भागाचा दौरा केला. आज गोंदियात पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही बाई शुद्धीत आहे की नाही, माहिती नाही आणि आपण हिला इतकं सिरिअसली का घेतोय? दुसऱ्या राज्यातून ती मुंबईत आली. येथे काम मिळवले, आपले घर केले. तरीही तिचे समाधान नाही का झाले. मुंबई आणि महाराष्ट्राने तिचे स्वागतच केले. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता हीच बाई मुंबईच्या मुळावर उठत असेल, तर ते योग्य नाही. माझ्या मते तिला सिरिअसली घ्यायलाच नको. 

अभिनेत्री कंगणा राणावत हिने मुंबईतील वातावरण पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरसारखे झाल्याचे ट्विट केले. त्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठते आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप कंगणाने केला होता. त्यावर शिवसेना धमकावत नाही, तर प्रत्यक्ष कृती करते, असे प्रत्युत्तर राऊतांनी दिले होते. या ट्विटर वॉरमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगणाच्या कानशिलात लावण्यासंदर्भात ट्विट करून या प्रकरणी पेटलेल्या आगीत आणखी तेल ओतले. याशिवाय भारतीय जनता पक्ष सोडला तर इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी कंगणावर टिकेची झोड उठवली आहे.             (Edited By : Atul Mehere)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com