फक्त दोनच आमदारांनी दिला कोरोना निधी, १3 आमदार नाहीत गंभीर... - only two mlas gave corona funds forteen mlas are not serious | Politics Marathi News - Sarkarnama

फक्त दोनच आमदारांनी दिला कोरोना निधी, १3 आमदार नाहीत गंभीर...

निलेश डोये
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

नागपूर जिल्ह्यात १२ विधानसभा तर तीन विधान परिषद, असे १५ आमदार आहेत. यात तीन मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश आहे. प्रत्येक आमदाराला २० लाखांचा फंड आरोग्य विभागाला द्यायचा होता. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार समीर मेघे यांच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांनी आपला फंड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिला नाही. 

नागपूर : जीवघेण्या कोरोना विषाणूने शहरासह जिल्हाभर थैमान घातले. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनही हादरले होते. कोरोनाच्या नियंत्रणासाठी आमदारांनी त्यांच्या निधीतून २० लाख रुपये कोरोनाच्या उपाययोजनांसाठी द्यावे, असे आदेश शासनाने दिले होते. परंतु जिल्ह्यातील केवळ दोनच आमदारांनी हा निधी जिल्हा परिषदेला दिला. यामध्ये काटोलचे आमदार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांचा समावेश आहे. उर्वरित १३ आमदारांनी अद्यापही कोरोनाबाबत गंभीरता दाखवलेली नाही. त्यामुळे हे आमदार कोरोनाबाबत किती गंभीर आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. 

जिल्ह्यातील १५ पैकी फक्त दोनच आमदारांनी कोरोनासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला निधी दिल्याचा खळबळजनक खुलासा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला. यामुळे या आमदारांना नागरिकांच्या आरोग्याची चिंता नसल्याचे दिसतेय. मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळणे सुरू आले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने चक्क लॉकडाउन केले. सरकारच्या महसुलावर परिणाम झाल्याने अर्थसंकल्पाला कात्री लावण्याची वेळ आली. आरोग्याकरिता निधी कमी पडता कामा नये म्हणून आमदार फंडातील २० लाख रुपये कोरोनासाठी आवश्यक साहित्य आणि उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाला देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला होता. नागपूर जिल्ह्यात १२ विधानसभा तर तीन विधान परिषद, असे १५ आमदार आहेत. यात तीन मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश आहे. प्रत्येक आमदाराला २० लाखांचा फंड आरोग्य विभागाला द्यायचा होता. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार समीर मेघे यांच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांनी आपला फंड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिला नाही. 

गृहमंत्री अनिल देशमुख व आमदार मेघे यांनी प्रत्येकी १०-१० लाख रुपये दिले. देशमुख यांच्या फंडातील ४ लाख ६४ हजार तर मेघे यांच्या फंडातील ५ लाख ८४ हजार रुपये आत्तापर्यंत खर्च झाले आहेत. 
डॉ. दीपक सेलोकर, आरोग्य अधिकारी, जि.प. 

१८७१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण 
जिल्ह्यात २० ऑक्टोबरपर्यंत १९ हजार ६५९ रुग्ण आढळले. यातील १७ हजार २३९ रुग्ण बरे झाले. तर सध्या ग्रामीण भागात १८७१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या ५४९ असल्याची माहिती डॉ. सेलोकर यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिली.
 (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख