बिहारसाठी खासदार कृपाल तुमाने स्टार प्रचारक, विदर्भातून एकमेव !

कृपाल तुमाने यांनी दुसऱ्यांदा रामटेकमधून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. सर्वप्रथम काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव करून सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर तुमाने यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. त्यामुळे मुकुल वासनिक यांनी पुन्हा पराभवाचा धक्का नको म्हणून निवडणूकच लढले नाही.
Krupal Tumane
Krupal Tumane

नागपूर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून पुन्हा नशीब अजमावण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे. या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह २० शिवसेना नेते बिहार निवडणुकीत प्रचार करणार आहेत. यामध्ये रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचीही ‘स्टार प्रचारक' म्हणून निवड केली आहे. या २० नेत्यांमध्ये विदर्भातून ते एकमेव आहेत. 

गुरुवारी शिवसेनेने बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात कृपाल तुमाने यांच्यासह सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश करण्यात आला आहे. 

कृपाल तुमाने यांनी दुसऱ्यांदा रामटेकमधून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. सर्वप्रथम काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव करून सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर तुमाने यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. त्यामुळे मुकुल वासनिक यांनी पुन्हा पराभवाचा धक्का नको म्हणून निवडणूकच लढले नाही. त्यांनी सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचासुद्धा तुमाने यांच्यासमोर टिकाव लागला नाही.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून पुन्हा नशीब अजमावण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा नुकतीच केली होती. त्यानंतर या निवडणूक प्रचाराची जबाबदारी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या वीसहून अधिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. बिहार निवडणुकीतील प्रचारात सहभाग घेणाऱ्या नेत्यांची यादी नुकतीच निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. 

निवडणूक लढवण्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता निवडणूक प्रचार, कुणाला कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी द्यायची, या संदर्भात लवकरच शिवसेना भवनात बैठक होऊन निर्णय घेतले जाणार आहेत. लवकरच बिहार निवडणूक प्रचाराची आखणी होऊन जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील. माझ्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघांची जबाबदारी सोपवतील तिथे मी जोरदार प्रचार करून शिवसेनेला यश मिळवण्यासाठी शक्ती पणाला लावणार असल्याचे खासदार तुमाने यांनी सांगितले.

(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com