दोन दिवसांपूर्वीच झाला डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस !

आनंदवनशी जुळलेल्या राज्यातील आणि देशविदेशांतील कलावंतांनी आणि ज्येष्ठ मंडळींनीही कुटुंबातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. पण हा वाद मिटला नसल्यानेच आजची दुःखद घटना घडल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
Vikas and Bharti Amte and Sheetal
Vikas and Bharti Amte and Sheetal

नागपूर : जगप्रसिद्ध समाजसेवी बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथे साकारलेल्या आनंदवनचे प्रमुख डॉ. विकास आमटे यांची मुलगी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज सकाळी विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी शीतलचे आईवडील डॉ. विकास आणि डॉ. भारती यांच्या लग्नाचा ४४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हा आभाळायेवढ्या दुःखाला सामोरे जावे लागेल, अशी कल्पनाही कुणी केली नसेल. 

काय झालं.., कसं झालं.., केव्हा झालं.., काय कारण.... असे एक ना अनेक प्रश्‍नांची गर्दी लोकांच्या डोक्यांत झाली. यातील केव्हा झालं, याचं उत्तर मिळालं. पण उर्वरित सर्व प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहेत. महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटें-करजगी यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केलेला व्हिडिओ का हटवण्यात आला. त्यानंतर आमटे कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे शीतल यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते. यामागे काय कारण असावे. शीतल यांनी समितीतील सदस्यांवर आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर आरोप केले होते. त्यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे काय, याचे ठोकताळे आता लावले जात आहेत. 

आमटे कुटुंबीयांत बऱ्याच मुद्यांवरून वाद होते. डॉ. शीतल यांचे त्यांच्या भावाशी पटत नव्हते, असेही सांगण्यात येते. आनंदवनमधील वाद, तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असून त्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ येऊ देऊ नये. कुटुंबीयांनी स्वतः सामंजस्याने घरातील वाद मिटवावे, असे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते. याशिवाय आनंदवनशी जुळलेल्या राज्यातील आणि देशविदेशांतील कलावंतांनी आणि ज्येष्ठ मंडळींनीही कुटुंबातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. पण हा वाद मिटला नसल्यानेच आजची दुःखद घटना घडल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दोनच दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर लगेच मुलीने आत्महत्या केल्याची बातमी आईवडिलांसाठी किती वेदना देणारी असेल, याची कल्पनाही करवत नाही, असेच शब्द लोकांच्या मुखातून निघत आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com