धानोरकरांनी सर्वांचे राजकीय अंदाज चुकवले आणि महाराष्ट्रात कॉग्रेसचा एक खासदार निवडून आला... - dhanorkar missed everyones political predictions and a congress mp was elected in maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

धानोरकरांनी सर्वांचे राजकीय अंदाज चुकवले आणि महाराष्ट्रात कॉग्रेसचा एक खासदार निवडून आला...

अतुल मेहेरे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

यवतमाळ येथे झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात खासदार बाळू धानोरकर यांनी तडाखेबाज भाषण केले. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर त्यांनी थेट ताशेरे ओढले. त्याचीही भरभरून प्रशंसा अशोक चव्हाण यांच्यासह मंचावरील सर्व उपस्थितांनी केली.

नागपूर : चंद्रपूर आणि यवतमाळच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या बलाढ्य केंद्रीय मंत्र्यांना पाडून कॉंग्रेसच्या बाळू धानोरकर यांना निवडून दिले. त्यावेळी आमची निवड योग्य होती, असे आज मी समाधानाने म्हणू शकतो. बाळू धानोरकरांचा इतिहास कॉंग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीला जाईल, असे प्रशंसोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्यासाठी काढले. 

परवा यवतमाळ येथे आयोजित कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खासदार धानोरकरांचं आजचं भाषण जबरदस्तच झालं, असे म्हणत मंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. राजकारणातील अनेक जाणकारांचे अंदाज फोल ठरवत बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा मतदार संघात ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी रचलेला हा इतिहास कॉंग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीला जाईल. आम्ही तू फक्त लढ म्हण, असं म्हणायचो. ते तुमच्याकडे (बाळू धानोरकर) बघूनच. तुमच्या सारख्या जोरदार व्यक्तीमत्वाची निवड योग्यच होती. त्यामुळे महाराष्ट्राचा एक क्रमांक शिल्लक राहीला, असं या ठिकाणी मी अगदी प्रामाणिकपणे म्हणतो. कारण यामध्ये काही चुकीचं नाही, अगदी शतप्रतिशत खरं आहे. त्यामुळे ते मान्यच करावं लागतं. 

मोठ्या कठीण परिस्थितीमधून आपण गेलो. चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांतील जनतेनं एकत्र येऊन केंद्रीय मंत्र्यांना पाडून याठिकाणी कॉंग्रेसला निवडून दिलं. हा इतिहास जेव्हा रचला गेला तेव्हापासून ते आजपर्यंत या इतिहासाचा साक्षीदार मी स्वतः आहे, ही बाब मी अभिमानाने सांगतो. याचा मला आनंद आहे, असेही मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. यवतमाळ येथे झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात खासदार बाळू धानोरकर यांनी तडाखेबाज भाषण केले. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर त्यांनी थेट ताशेरे ओढले. त्याचीही भरभरून प्रशंसा अशोक चव्हाण यांच्यासह मंचावरील सर्व उपस्थितांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख