मंत्री असलो तरी ओबीसी कार्यकर्ताच : विजय वडेट्टीवार

ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक, नोकरी विषयक, राजकीय प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. या न्यायाने ओबीसी समाजाला मोठा निधी राज्य सरकारकडून मिळायला हवा. तो मी मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.
Vijay Vadettiwar
Vijay Vadettiwar

नागपूर : मी आघाडी सरकारमध्ये मंत्री असलो तरी स्वतःला ‘ओबीसीं’चा कार्यकर्ता समजतो, अशा भावना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत आज श्री वडेट्टीवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त भावना व्यक्त केली. 

यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, देशांमध्ये ५२ टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाजाला महाराष्ट्रात फक्त १९ टक्के आरक्षण संवैधानिक सहमतीवर आहे. खरे तर ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक, नोकरी विषयक, राजकीय प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. या न्यायाने ओबीसी समाजाला मोठा निधी राज्य सरकारकडून मिळायला हवा. तो मी मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय ओबीसी समाजाच्या चळवळीत जास्तीत जास्त योगदान देण्याचाही माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. 

महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सचिन राजूरकर, अशोक जीवतोडे, शरद वानखेडे, त्रिशरण सहारे, सुषमा भड, अॅड. रेखाताई बारहाते, शकील पटेल, कल्पनाताई मानकर, गुणेश्वर आरीकर, भंडारा जिल्हा संयोजक प्रथा खुशाल शेंडे, पूर्व नागपूरचे अध्यक्ष नाना झोडे, दक्षिण-पश्चिमचे अध्यक्ष उदय देशमुख, पश्र्चिमचे दिलिप भोयर, सुनीता येरणे, राजेश रहाटे, ओबीसी विद्यार्थ्यी संघटनेचे महासचिव रोशन कुंभलकर, सोनिया वैद्य, मयुर वाघ, उज्ज्वला महाले, शुभम वाघमारे, विजय हजारे उपस्थित होते.               (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com