‘या’ आठ मंत्र्यांना आणि २९ आमदारांना कोरोनाचा झटका, कसे होणार अधिवेशन..?

अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी राज्यातील प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रयोगशाळा उद्या (रविवार, ता. 6) सुरू ठेवण्याचे आदेश विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिले आहेत. या आदेशानुसार, आमदारांनी त्यांची कोरोना चाचणी करून घेणे अधिक सुलभ होणार आहे.
Vidhansabha
Vidhansabha

नागपूर : राज्यात कोरोना रौद्र रूप धारण करीत असताना येत्या सात आणि आठ तारखेला पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोनाच्या सावटात हे अधिवेशन होणार, हे नक्कीच आहे. पण सरकारमधील आठ मंत्री, विधानसभेचे २५ आमदार, विधानपरिषदेचे चार आमदार आणि विधानसभा अध्यक्षांना कोरोनाने झटका दिला आहे. त्यामुळे हे अधिवेशन कसे राहील, याची चर्चा आता होत आहे. 

राज्य सरकारमधील ३८ लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा झाली. यांपैकी काही जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. पण तरीही उद्या सर्व लोकप्रतिनिधींना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील प्रयोगशाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जिल्ह्यात ही चाचणी करून घ्यायची आहे. 55 पेक्षा अधिक वय असलेले आमदार हे हाय रिस्क झोन मध्ये येतात. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

राज्य सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, शिवसेनेचे, अब्दुल सत्तार, कॉंग्रेसचे असलम शेख, अशोक चव्हाण आणि सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. विधानसभेचे मकरंद पाटील राष्ट्रवादी, किशोर जोरगेवार अपक्ष, ऋतुराज पाटील काँग्रेस,  प्रकाश सुर्वे शिवसेना, पंकज भोयर भाजप, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी, मुक्ता टिळक भाजप, वैभव नाईक शिवसेना, सुनील टिंगरे राष्ट्रवादी, किशोर पाटील शिवसेना, यशवंत माने राष्ट्रवादी, मेघना बोर्डीकर भाजप, सुरेश खाडे भाजप, सुधीर गाडगीळ भाजप,, चंद्रकांत जाधव काँग्रेस, रवी राणा अपक्ष, अतुल बेनके राष्ट्रवादी, प्रकाश आवाडे अपक्ष, अभिकामन्यू पवार भाजप, माधव जळगावकर काँग्रेस, कालिदास कोलंबकर भाजप, महेश लांडगे भाजप, मोहन हंबरडे काँग्रेस, अमरनाथ राजूरकर काँग्रेस, मंगेश चव्हाण भाजप, विक्रांत सावंत जत कॉंग्रेस या आमदारांना कोरोनाची बाधा आहे. विधानपरिषदेचे सदाभाऊ खोत भाजप, सुजित सिंग ठाकूर भाजप, गिरीश व्यास भाजप आणि नरेंद्र दराडे भाजप हे आमदार कोरोनाबाधित आहेत. यांपैकी काही लोकप्रतिनिधींनी कोरोनावर मात केली असली तरी त्यांना अधिवेशनात सहभागी होण्यासाठी चाचणी करावी लागणार असल्याचे सांगण्यात येते. 

आमदारांच्या कोरोना चाचण्यांसाठी रविवारी प्रयोगशाळा राहणार सुरू
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी राज्यातील प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रयोगशाळा उद्या (रविवार, ता. 6) सुरू ठेवण्याचे आदेश विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिले आहेत. या आदेशानुसार, आमदारांनी त्यांची कोरोना चाचणी करून घेणे अधिक सुलभ होणार आहे.

अधिवेशनावर कोरोनाचे संकट असल्याने राज्य सरकारच्यावतीने कोरोनाबाबतची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्या त्या जिल्ह्यातील आमदारांची कोरोना चाचणी करून त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विधानमंडळ सचिवाला पाठविण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची कोरोनाची चाचणी करणे आवश्‍यक असल्याने सोलापूर जिल्ह्यातील आरटी- पीसीआर चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा उद्या (रविवार, ता. 6) सुरू ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
विधानमंडळाच्या सर्व सदस्यांना शनिवारी आणि रविवारी त्यांच्या गावाजवळील शासनमान्य किंवा शासकीय प्रयोगशाळेत कोरोनाच्या चाचण्या करणे शक्‍य व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांच्या चाचणीचा रिपोर्ट त्यांना त्वरित उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यांच्या जवळच्या प्रयोगशाळेत चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

परवाना रद्दचाही आदेश
आमदारांची चाचणी केल्यानंतर ज्या प्रयोगशाळा रविवारी त्यांचा  
रिपोर्ट देऊ शकत नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आमदारांच्या चाचणीचा रिपोर्ट विधानमंडळ सचिवालयाला सादर केला जाणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com