बावनकुळेंनी नोकऱ्या वाचवल्या होत्या, राऊतांनी केले बेरोजगार !

राऊत यांनी लॉकडाउनच्या काळात दिलेल्या एकाही घोषणेची अंमलबजावणी केली नाही. संपूर्ण शहर व राज्यातील वीजग्राहक वीजबिलामुळे पोळले जात आहेत. कोणतीही सवलत वीजग्राहकाला मिळू शकली नाही. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेरोजगार करण्याची कारवाई थांबवावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
Krishna Khopde
Krishna Khopde

नागपूर : यापूर्वीच्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अडचणीच्या काळात तेव्हा एसएनडीएलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवल्या होत्या. पण विद्यमान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्याच कर्मचाऱ्यांना कंत्राट संपल्याचे कारण देत त्यांना बेरोजगार केले असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.  

एसएनडीएलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या मुद्द्य़ावरून भाजप-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. आमदार कृष्णा खोपडे यांनीही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. एसएनडीएलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून एक ऑक्टोबरपासून कामावर न येण्याबाबत सांगण्यात आले. लागोपाठ ८-९ वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमानुसार काढता येत नाही. परंतु, कंत्राट संपल्याचा आधार घेत त्यांना बेरोजगार करण्यात आले आहे. एकीकडे बेरोजगारीच्या मुद्द्य़ावरून काँग्रेसने देशभरात आंदोलन पुकारले असताना दुसरीकडे अनेक युवकांचा रोजगार हिसकावून त्यांना बेरोजगार करण्याची दुटप्पी भूमिका काँग्रेसच्या मंत्र्याने घेतली असल्याचा हल्लाबोल खोपडे यांनी केला आहे. 

राऊत यांनी लॉकडाउनच्या काळात दिलेल्या एकाही घोषणेची अंमलबजावणी केली नाही. संपूर्ण शहर व राज्यातील वीजग्राहक वीजबिलामुळे पोळले जात आहेत. कोणतीही सवलत वीजग्राहकाला मिळू शकली नाही. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेरोजगार करण्याची कारवाई थांबवावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com