मुंबई : कोरोनाबाबत काही आकडेवारी जाहीर करून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रसेल फाॅस्टेल या शास्त्रज्ञांची काही वाक्य सांगितली. हे सांगताना आपण खोटं बोलत नसून, त्याचे पुरावे असल्याचे सांगताना ते म्हणाले, ``मी खोटं बोलत नाही. आईची शपथ घेऊन सांगतो, अन्यथा मी राजकारणातून बाद होईल.``
मुनगंटीवर यांनी आज विधानसभेत अधिवेशनात विविध प्रश्नांवर जोरदार फटकेबाजी करीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. शेतकरी, वीज, कोरोना आदी प्रश्न मांडत त्यांनी सरकारची खरडपट्टी काढली.
जहाजाचा कॅप्टन हतबल होतो तेव्हा...
कोरोनाबाबत बोलताना ते म्हणाले, की कोरोनाची लस कधी येणार, याबाबत नुसतीच चर्चा होते आहे. आॅक्सफर्डचा शास्त्रज्ञ रसेल फाॅस्टेल म्हणतो, `माता- पिताजी को तकलिफ पहुचे, ऐसा व्यवहार नही होना चाहिए। ` हे पाहताना माझ्यासमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच आले. त्यांचे विचार या सरकारने किती तंतोतंत वापरले, याचा विचार व्हायला हवा. कोरोनाच्या काळात लोकांचे झालेले हाल, झालेले मृत्यू पाहावले नाही. कोरोनाच्या संकटात आपण पाणीपतच्या सेनापतीसारखे हतबल झालो. त्यात जे मृत्यू झाले, त्यांची कधी चाैकशी झाली का. आॅक्सिजनचा पुरवठा कमी होता. प्रेशर कमी होतं. कोणीच कोणाचं मायबाप नव्हते. मंत्री राजेश टोपे यांचे धन्यवाद मानायला हवेत. त्यांनी किमान बैठका तरी घेतल्या. औषधे नाहीत. इंजेक्शनचे ब्लॅक मार्केट होतात. हे संकट असताना सरकारने काय केले, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
कोरोनामुळे मृत झालेल्यांचे काय
मुनगंटीवर म्हणाले, की आरोग्य विभागाची नोकरभरती करावी, पण ती झाली नाही. अशा संकटाच्या काळात जहाजाचा कप्तान हतबल होतो. हे कसं काय होतं. जे डाॅक्टर मृत्यूमुखी पडले, त्यांना 50 कोटी केव्हा देता. मी विनंती केली की सात दिवसांत मदत द्यावी. जे सरकारी अधिकारी-कर्मचारी, आरोग्य सेवक कोरोनाच्या मैदानात येऊन बाजीगरसारखे लढतात, त्यांच्याबाबत काय केले. डाॅक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपाखाली नोकरी देणे आवश्यक होते, परंतु हा निर्णय झाला नाही.
मुख्यमंत्र्यांचा काॅम्प्युटर ओला झाला
मुनगंटीवार म्हणाले, मी ई-मेलवर प्रश्न पाठवित होतो. रोज दोन-दिवसाआड गरीबांचे प्रश्न पाठवितो. निर्णय होतील, असे वाटले, परंतु काकहीच नाही. एकदा मंत्रालयात गेलो. तेव्हा एक माणूक काॅम्पयुटर पुसत होता. तो म्हणाला, काॅंम्प्युटर ओला झाला.
मी म्हणालो, तो ओला नाही, गरीबांचे प्रश्न रोज येतात, म्हणून तो रडतो आहे, असे म्हणताच सभागृहात हंशा पिकला.
Edited By - Murlidhar Karale

