आम्हाला अटक केली, ठाकरे सरकाला लाज वाटली पाहजे : किरीट सोमय्या - We were arrested, Thackeray government should be ashamed: Kirit Somaiya | Politics Marathi News - Sarkarnama

आम्हाला अटक केली, ठाकरे सरकाला लाज वाटली पाहजे : किरीट सोमय्या

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 एप्रिल 2021

कौसा कोव्हिडं सेंटर सुरू झाले पाहिजे व या साहित्य चोरी प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

मुंबई : ठाकरे सरकारला लाज वाटली पाहिजे, ज्यावेळी कोविड सेंटरची अत्यंत गरज आहे, त्यावेळी हे कोविड सेंटर बंद करण्यात आले. त्यातील समान चोरीला गेले. आम्ही पाहणी करायला आलो होतो, तर आम्हाला अटक झाली. ठाकरे सरकारची इज्जत जाईल म्हणून पोलिसांनी मला अडवले, असा आरोप या वेळी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केला.

कौसा कोव्हिडं सेंटर सुरू झाले पाहिजे व या साहित्य चोरी प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथील बंद कोव्हिडं सेंटर मधील साहित्य ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी चोरल्याच्या आरोप केला होता. त्याची पाहणी करण्यासाठी भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या मुंब्रा कौसा येथे येणार होते. त्याआधीच पारसिक रेतीबंदर येथे कळवा पोलिसांनी माजी खासदर किरीट सोमय्या यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या वेळी कळवा व मुंब्रा पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता. कळवा पोलिसांनी सोमय्या यांना रेतीबंदर येथे पोलिसांनी गाडीत ताब्यात घेतल्यावर भाजप आक्रमक झाले आणि त्यादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली.

कोविड सेंटरमधील सामान चोरी झाल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर भाजप माजी खासदार किरीट सोमय्या आणि भाजप नेते हे कोविड सेंटरला भेट देण्यासाठी मुंबईहून मुंब्रा कौसा च्या दिशेने जात असताना कळवा पोलिसांनी नाकाबंदी लावून कळवा पोलिसांनी पारसिक रेतीबंदर येथे किरीट सोमय्या यांची गाडी अडवून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजप आक्रमक झाली.

सोमय्या म्हणाले, की कोविड रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. एका बेडवर 3 ते 4 जण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन चा तुटवडा आहे. आपले अपयश लपविण्यासाठी ठाकरे सरकार लॉकडाऊनचे नाटक करत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फार मोठ नाटक करून किव्हिडं सेंटरचे उदघाटन केले, परंतु कॉन्ट्रॅक्टरचे दीड कोटी बाकी राहिले आहेत. याचे पैसे ठाणे मनपा देणार की म्हाडा यासाठी तुम्ही लोकांच्या जीवनाशी खेळत असल्यामुळे ठाकरे सरकारचा निषेध केला आहे.

ग्रामीण भागात ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यासाठी प्रचंड क्षमता वाढवावी लागणार आहे. ठाकरे सरकार ने काम करावे, त्या सचिन वाझे वसुली गॅंगमधून बाहेर पडावे, अशी घणाघाती टीका या वेळी सोमय्या यांनी केली. 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख