शिवसेनेतच शिकलोय, तुम्ही सांभाळा ! नारायण राणेंनी साधला संजय राऊतांवर निषाणा

धमकीची भाषा काय करता, ज्यांनी कुणाच्या कानशिलात लगावली नाही, त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. आता स्वतःला सांभाळा.
 Rane and raut.jpg
Rane and raut.jpg

मुंबई : मी शिवसेनेत (Shivsena) शिकलोय. तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, नाॅनव्हेज कशी द्यायची हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे सांभाळा, अशा इशारा ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना दिला. (We have learned only in Shiv Sena, you take care! Narayan Rane targeted Sanjay Raut)

भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांत झालेल्या राड्याबाबत राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत राऊत यांच्यावर टीका केली.

राणे म्हणाले, की धमकीची भाषा काय करता, ज्यांनी कुणाच्या कानशिलात लगावली नाही, त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. आता स्वतःला सांभाळा, असा इशारा राणे यांनी दिला. 

राणे म्हणाले, की राणे जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी देत नाहीत. महिलांवर ज्यांनी हात उचलले त्यांची नावं आमच्याकडे आली आहेत. त्यांना पाहून घेऊ. या लोकांना शिवथाळी दिल्याशिवाय स्वस्थ झोपणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

तुमचं योगदान तरी काय

संजय राऊत यांना शिवसेना भवनचा इतिहास माहिती आहे का, असा असा प्रश्न करून राणे म्हणाले, की माझ्या सारख्या शिवसेना कार्यकर्त्याने वर्गणी दिली आणि वर्गणीही जमवून दिली. तेव्हा शिवसेना भवन उभे राहिले आहे. तुमचं योगदान तरी काय? तुम्ही नोकरीला आला. तुम्ही कधी शिवसैनिक आणि नेता झालात हे सांगणार नाही. तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काय केलं? असा सवालही नारायण राणे यांनी केला.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळेल का? याबाबत बोलताना त्यांनी याबद्दल फारसं बोलणं टाळलं. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल केंद्रातील भाजपचे नेते निर्णय घ्यायला सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com