मुद्रांक शुल्कावरून विधानसभेत गदारोळ ! मुनगंटीवार यांच्या आरोपाला थोरातांचे उत्तर

विधानसभेचे अधिवेशन मुंबई येथे सध्या सुरू आहे. आज सायंकाळी मुद्रांक शुल्काच्या बिलाबाबत चर्चा झाली. हे बिल गुपचूप पास करण्यात आल्याचा आरोप मुनगंटीवार केला.
मुद्रांक शुल्कावरून विधानसभेत गदारोळ ! मुनगंटीवार यांच्या आरोपाला थोरातांचे उत्तर
thoarat and mungantivar.png

मुंबई ः मुद्रांक शुल्क कमी करण्याबाबतच्या निर्णयावर आज विधानसभेत गदारोळ झाला. यापूर्वी पास केलेल्या या बिलावर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत मतदान घेण्याची मागणी केली. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले. कोरोनाने ठप्प झालेले व्यवहार या निर्णयामुळे सुरू झाले असून, त्यामुळे अर्थव्यवस्था गतीमान झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या निर्णयाचे पंतप्रधानांनीही स्वागत केल्याचे सांगितले.

विधानसभेचे अधिवेशन मुंबई येथे सध्या सुरू आहे. आज सायंकाळी मुद्रांक शुल्काच्या बिलाबाबत चर्चा झाली. हे बिल गुपचूप पास करण्यात आल्याचा आरोप मुनगंटीवार केला. ते म्हणाले, की मुद्रांक शुल्क महाराष्ट्राच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. पेट्रोल, डिझेल, मुद्रांक शुल्क हे विषय जीएसटीचा भाग करावा, अशी ज्या वेळी चर्चा झाली. दारू, मुद्रांक शुल्क,मुद्रांक शुल्कात 30 हजार कोटी रुपये मिळतात. मुद्रांक शुल्क कमी करून कार्पोरेटचे उत्पन्न करीत आहात. काहीही नियमांच्या बाहेर जायचे. रुल्स आॅफ बिझनेस मोडून काढायचे, ही मुजोरी आहे. शासन म्हणून काही दिवस तुम्हाला वागता येईल. गरीब जनतेचे दहा हजार कोटींवर हक्क आहे. तुम्हाला द्यायचा, तर लपून का देता. तुम्हाला द्यायचा ना मुद्रांक शुल्क, पूर्ण माफ करा. या निर्णय मंत्रालयात होईल, की कोणाच्या घरात होईल, हे पहावे. का फाईल गेली नाही. हा मंत्र्यांनी मांडायचा विषय आहे. आमची अक्कल फक्त बिल्डरांच्या सोयीसाठी आहे, असा आरोप करून मुनगंटीवार म्हणाले, की अरे कोरोनामध्ये लोकांकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत ही सवलत कशासाठी दिली. दहा हजार कोटी रुपयांचा निर्णय होतो, तुम्ही वित्त विभागाला विचारणार नाही. ही काय पोखरणची चाचणी आहे का, गुप्त ठेवण्यासाठी. अशी सरकारकडून अपेक्षा नाही. यावर मतदार घ्या.  तुम्ही बहुमतात असाल, आम्ही अल्पमतात असू, पण उभा महाराष्ट्र पाहिल. शंभर वर्षांनी इतिहास लिहिला जाईल, फार वर्षांपूर्वी एक राज्यकर्ता असा होता, की जो बिल्डरांच्या लाॅबीसाठी रुल्स आॅफ बिझनेसचा खून करायला निघाला होता, असे लोक म्हणतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बिलाला विरोधच करणार

मुनगंटीवार म्हणाले, की प्रामाणिकपणामध्ये शंका का करता आहेत. आम्ही एव्हढेच म्हणतो रुल्स आॅफ बिझनेसनुसार फाईल तयार करा. ही परंपरा चांगली नाही. महाराष्ट्रात अशा घटना होतातच कशा. ती पाठवायची नाही फाईल. या बिलाला पाठिंबा तर सोडाच, त्याला विरोध आहे. याच्यावर मतदान घ्या. हे रॅकार्डवर आणावेच लागेल. अन्यथा एक निर्णय करा, कॅबिनेटमध्ये एकही निर्णय करा.जे होतील, ते सभागृहात होईल. 

अजित पवार यांचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत बोलताना हा कर व मेट्रोकर आहे. याबाबत हे aबिल आणले आहे. नगरविकासचा हा विषय आहे. या कायद्याचा व मुद्रांकचा तसा काही संबंध नाही. हा फक्त स्थानिक कर व मेट्रो कर आहे, एव्हढेच मला सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचे आहे, असे सांगितले. 
लोकांनी याचे स्वागत केले : थोरातमुनगंटीवर यांच्या आरोपाला उत्तर देताना थोरात म्हणाले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प झालेल्या व्यवहाराबाबतचा निर्णय आहे. तो निर्णय अत्यंत चांगला आहे. सर्वात जास्त काैतुक त्या निर्णयाचे होत आहे. एव्हढेच नाही, तर पंतप्रधानांनीही इतर राज्यांना सुचना दिल्या आहेत, की महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे इतरांनी निर्णय घ्या. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in