खंडणीवसुली आरोपांवर दोन स्वतंत्र याचिका
Anil deshmukh.jpg

खंडणीवसुली आरोपांवर दोन स्वतंत्र याचिका

विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या कुख्यात नयन राजेंद्र तांदळे (वय 25, रा. भिस्तबाग नाका, सावेडी) याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील खंडणीवसुलीच्या आरोपांबाबत मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. सीबीआय किंवा सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

परमबीर सिंग यांच्या पत्राचा आधार घेऊन वकील जयश्री पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मलबार हिल पोलिसांनी या पत्रात उल्लेख केलेल्या दिवसांचे सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घ्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली.

तसेच निष्पक्ष तपासासाठी ‘सीबीआय’ किंवा ‘ईडी’सारख्या यंत्रणेला नियुक्त करावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे. याचिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही प्रतिवादी केले आहे. सिंग यांच्या भूमिकेचा तपास करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे. सिंग पोलिस विभागाच्या सर्वोच्च पदावर वर्षभर होते आणि तरीही त्यांनी या प्रकारावर भाष्य केले नाही आणि कायदेशीर कारवाई केली नाही, त्यामुळे त्यांच्या कामाचा तपास करावा, असे याचिकेत म्हटले आहे. दोन्ही याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा...

तांदळे टोळीविरुद्ध "मोक्का' 

नगर : विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या कुख्यात नयन राजेंद्र तांदळे (वय 25, रा. भिस्तबाग नाका, सावेडी) याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तांदळे टोळीविरुद्ध "मोक्का' अन्वये कारवाई करण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांनी त्यास मंजुरी दिली. तांदळे याच्या टोळीतील पाच सदस्यांवर "मोक्का' अन्वये कारवाई करण्यात आली. 

नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल भाऊराव साळवे (वय 27, रा. झापवाडी, ता. नेवासे), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय 23, प्रेमदान चौक), शाहूल अशोक पवार (वय 31, रा. सुपे, पारनेर), अमोल छगन पोटे (वय 28, रा. सुपे) यांचा त्यात समावेश आहे. सुपे परिसरात, तसेच नगर-पुणे महामार्गावर पारनेर हद्दीत या टोळीने अनेकांना लुटले आहे. तांदळे याच्याविरुद्ध सुपे पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्तालुटीचे सात गुन्हे दाखल आहेत. 

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in