`त्या` पुस्तकाच्या माध्यमातून भाजपकडून महाविकास आघाडीची चिरफाड

महाराष्ट्रात अनेक निवडणुका आहेत. त्यामध्ये भाजप नेत्यांना भाषणाचे मुद्दे या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहेत.
book.png
book.png

दरेकर यांच्याकडून पुस्तिकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीची चिरफाड

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले, परंतु या सरकारने कोणताही वचनपूर्ती केली नाही, असा आरोप करीत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते तथा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी `ही कसली वचनपूर्ती` हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातून महाविकास आघाडीची चिरफाडच करण्यात आल्याचे मानले जाते.

मुंबईत आज भाजपच्या पत्रकार परिषदेत दोन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. दरेकर यांनी लिहिलेल्या `ही कसली वचनपूर्ती` व आमदार अतुल भातखळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. भातखळकर यांनी या पुस्तकातून मुंबईतील काळे वर्ष कशा पद्धतीने मानले जाईल, याबाबत अनेक आरोप करण्यात आले आहे. या पुस्तकांचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 

पत्रकार परिषद सुरू होण्याच्या आधीच या दोन्ही पुस्तिकेचे प्रकाशन होऊन त्याच्या प्रती पत्रकारांना वाटण्यात आल्या. या पुस्तिकेतून महाविकास आघाडीची चिरफाड करण्यात आली आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनापैकी कोणतेच कामे झाले नसल्याचा आरोप पुस्तिकेद्वारे करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात लोकांना जगविण्याचे महत्त्वाचे काम असताना सरकारने घेतलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले, या महत्त्वाच्या विषयासह अनेक विषयांचा उहापोह या पुस्तकेतून करण्यात आला आहे. तसेच तीन पक्षाच्या सरकारमधील नेत्यांमध्ये अवमेळ झाल्याने विकास खुंटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भातखळकर यांनी लिहिलेल्या पुस्तिकेत मुंबईचा स्वतंत्र उल्लेख आहे. मुंबईत अनेक कामे प्रलंबित आहेत. यापूर्वीची मंजूर कामे रखडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख करण्यात आला आहे. भविष्यात मुंबईकरांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहेत, या विषयालाही या पुस्तिकेच्या माध्यमातून स्पर्ष करीत महाविकास आघाडीला त्यामध्ये लक्ष्य करण्यता आले आहे.

आगामी प्रचाराला सोयीचे पुस्तक

आगामी काळात मुबंई महापालिकेची निवडणूक आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक निवडणुका आहेत. त्यामध्ये भाजप नेत्यांना भाषणाचे मुद्दे या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहेत. महाविकास आघाडी सरकारवर आरोप करण्यासाठी या दोन्ही पुस्तकांचा भाजप नेत्यांनाच चांगला उपयोग होईल, असे मानले जाते.

Edited By - Murlidhar karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com