मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध निवड करण्याची दिलेले प्रलोभन योग्य नाही, अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास हा निधी आणणार कोठून, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आमदार लंके यांना टोला लगावला आहे.
आमदार लंके यांनी नुकतीच घोषणा करून मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरोध होतील, त्यांना 25 लाखांचे बक्षिस दिले जाईल, असे सांगितले आहे. यावर दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून टीका केली आहे.
दरेकर म्हणाले, की सलोखा ठेवण्याची ही घोषणा बरोबर आहे. मात्र २५ लाख रुपये मी गावासाठी देणार, अशा प्रकारचे अमिष त्याठिकाणी देणं योग्य नाही. आमदार निधी गावाला दिलाच पाहिजे. विकास कामांमुळे गाव एकोप्याने बिनविरोध निवड करू शकेल. खरंतर आमदार निधी किती असतो केवळ दोन- तीन कोटी. त्यामध्ये दोनशे अडीचशे ग्रामपंचायती असतात. त्यामुळे प्रत्यक्षात ही गोष्ट होऊ शकत नाही. निधी देण्याचा गोष्टी होता कामा नये. एवढे पैसे सरकाकर पण देऊ शकत नाही.
आमदारांनी गावागावांत निधी न्यावा
विकासात्मक कामासाठी त्याठिकाणी खर्च करावा. ते आमदार आहेत. त्यांनी गावागावांत निधी न्यावा. बिनविरोध निवड करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून स्वागतार्ह आहे. पण त्यासाठी निधी देणे, हे बोलणं संयुक्त नाही, असं मला वाटतं. अशी प्रतिक्रिया विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
दरम्यान, आमदार लंके यांनी मात्र घोषणा करून टाकली आहे. जर अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर हा मोठा निधी आमदार लंके कोणत्या निधीतून देणार. निधी देण्यावरही अनेक बंधने आहेत. असे असताना लंके यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात येऊ शकत नाही, असाच सूर दरेकर यांनी लावला आहे. त्यामुळे आगामी काळात अशा घोषणा करताना महाराष्ट्रातील इतर आमदारही दचकून राहणार आहेत.
Edited By - Murlidhar Karale

