विरोधी पक्षाची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी ! राऊत यांचा काॅंग्रेसला चिमटा - The state of Opposition is Patilki of Osad village! Raut tweaks Congress | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधी पक्षाची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी ! राऊत यांचा काॅंग्रेसला चिमटा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 डिसेंबर 2020

खासदार राऊत म्हणाले, की सरकारला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करायला हवे. युपीए हे राजकीय संघटन आहे. त्यांची अवस्था सध्या एनजीओप्रमाणे झाली आहे. युपीएमध्ये असलेले राजकीय पक्ष काय करतात, याकडेही पाहणे गरजेचे आहे.

मुंबई : विरोधी पक्षाची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखे आहे. या पाटिलकीला कोणी गांभिर्य़ाने गंगेत नाही. त्यामुळेच 30 दिवसांपासून दिल्लीत शेतकरी निर्णयकी अवस्थेत बसलाय. ओसाड गावची डाकडुजी तात्काळ करावी लागेल, अशी टीका शिवसेने नेते, खासदार संजय राऊत यांची काँग्रेसवर केली.

खासदार राऊत म्हणाले, की सरकारला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करायला हवे. युपीए हे राजकीय संघटन आहे. त्यांची अवस्था सध्या एनजीओप्रमाणे झाली आहे. युपीएमध्ये असलेले राजकीय पक्ष काय करतात, याकडेही पाहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये ममता लढा देत आहे, देशातील सर्व विरोधकांनी त्यांच्या पाठिशी उभे राहायला हवे. मरतुकड्या अवस्थेतील विरोधी पक्ष हे चित्र बरं नव्हे, असा चिमटा त्यांनी काॅंग्रेसला काढला आहे.

 

हेही वाचा...

शेतीसाठी दिवसा विजपुरवठा करण्याची मागणी

श्रीरामपूर : तालुक्यातील अनेक भागात बिबट्याची दहशत कायम असून, गेल्या काही दिवसांत बिबट्याचे हल्ले वाढले आहे. शिवारातील बिबट्याची धास्ती आणि थंडीचा कडका वाढल्याने रात्रीच्यावेळी रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी मजुरी वाढली आहे.

रात्रीच्या विज पुरवठ्यामध्ये यापुर्वी एका मजुरासाठी 200 रुपये मोजावे लागत होते. 
परंतू आता थंडाचा कडाका वाढला असून, त्यात बिबट्याचा धुमाकुळ सुरु असल्याने शेतमजुर रात्रीच्यावेळी शेतात जाण्यास नकार दर्शवतो. त्यामुळे वाढीव पैसे मोजावे लागत आहे. तालुक्यात अनेक भागात सध्या शेतीसाठी रात्री विजपुरवठा होत असून, गहु, हरभरा, मका पिकांसह कांदा लागवड सुरू असल्याने पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागते. 

बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने रात्री शेतात एकटे जाणे भितीदायक आहे. त्यामुळे शेतीमालक आणि शेतमजुर असे दोघे रात्रीच्यावेळी शिवारात पिकांना पाणी देताना दिसून येतात. मागील वर्षी रात्रीच्यावेळी रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी एका मजुराला 200 रुपये मोजावे लागत होते. परंतू आता 200 रुपये मजूरी देवून शेतमजूर येत नसल्याने 400 रुपये मजूरी देवून मजूराला रात्री सोबत जाण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. 

तालुक्यात सर्वत्र आठ दिवसांपासून थंडीचा जोर वाढत असून, सायंकाळी पाच वाजेपासून गारवा जाणवत आहे. तसेच तालुक्यातील अनेक शिवारात बिबट्याची धास्ती कायम असून, थंडी वाढल्याने रात्रीच्यावेळी शेतीला विजपुरवठा करण्यापेक्षा दिवसा विजपुरवठा करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. सध्या तालुक्यात शेतीसाठी रात्री विजपुरवठा सुरु असल्याने जीव धोक्यात टाकुन शिवारात काम करण्याची वेळ शेतमजूरांसह बागायतदारांवर आली आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख