तर राजीनामा देण्याचे धाडस भुजबळ दाखवतील का ? प्रविण दरेकर यांचा प्रश्न - So will Bhujbal show the courage to resign? Question by Pravin Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

तर राजीनामा देण्याचे धाडस भुजबळ दाखवतील का ? प्रविण दरेकर यांचा प्रश्न

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 जून 2021

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे धाडस छगन भुजबळ दाखवतील का ?

मुंबई : राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या संघटनेने ओबीसी समाजाच्या आरक्षणावरुन सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला, याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्वास नाही. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे धाडस छगन भुजबळ दाखवतील का ? असा बोचरा प्रश्न विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विचारला आहे. (So will Bhujbal show the courage to resign? Question by Pravin Darekar)

आरक्षणासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. समता परिषदेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या घडामोडींसंदर्भात दरेकर यांनी वरीलप्रमाणे मतप्रदर्शन केले आहे. 

छगन भुजबळ राज्याचे प्रमुख नेते असून सरकारमधील ज्येष्ठ व वजनदार मंत्री सुद्धा आहेत. कॅबिनेट मध्ये अथवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही, असे दरेकर यांनी दाखवून दिले. 

ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण साधण्याचा हा प्रयत्न आहे. जर आपल्या समाजाविषयी एवढी तळमळ असेल तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकराने न सोडवल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे धाडस भुजबळ दाखवतील का ? असा खोचक सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

 

हेही वाचा..

कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्चंटस्‌ बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख

नगर : अहमदनगर मर्चंटस्‌ को ऑप.बँकेने कोविड महामारी लक्षात घेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाखांची मदत केली आहे. विद्यमान सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे या मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

या वेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत, अध्यक्ष अनिल पोखरणा, उपाध्यक्ष सुभाष बायड, संचालक संजय बोरा उपस्थित होते.

सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले, की अहमदनगर मर्चंटस्‌ बँकेच्या  कामकाजाबाबत अहमदनगर जिल्हाधिकारी असल्यापासून परिचित आहे. उत्कृष्ट बँकिंग सेवा देतानाच सामाजिक कार्यातही ही बँक नेहमीच अग्रेसर असते. सहकारातून समृध्दी हा मंत्र जपताना सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडण्यात बँक देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. करोना महामारीला समर्थपणे तोंड देण्यासाठी अशाच सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

पोखरणा म्हणाले की, बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने नेहमीच आपत्तीच्या प्रसंगात समाजासाठी योगदान दिले आहे. संकट समयी कर्तव्यभावनेने समाजाला मदत करण्यात बँक नेहमीच अग्रेसर असते. कोविड महामारी आल्यावर आताही पुन्हा 11 लाख रुपये मदत देण्यात आली आहे.

हस्तीमल मुनोत यांनी सांगितले की, कोविड काळात मर्चंटस्‌ बँकेने सुरक्षितीतेची सर्व काळजी घेवून ग्राहकांना अविरत सेवा दिली आहे. बँकेने सुरुवातीपासून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंप, गुजरातमधील कच्छ भूकंप, महाराष्ट्रातील दुष्काळ अशा आपत्तीच्या प्रसंगात बँकेने सक्रिय योगदान दिले आहे. नगरमध्येही राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 28 मार्चला बँकेमार्फत रक्तदान शिबीर घेण्यात येते. यादिवशी विविध ठिकाणच्या सामाजिक उपक्रमांनीही मदत केली जाते.
 

हेही वाचा..

मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल

 

 

Edited By = Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख