या कारणाने भाजपने बिहारची निवडणूक जिंकली ! फडणवीस यांनी सांगितले गुपित

महाराष्ट्रातसरकारच्या माध्यमातून काय चालले आहे, मागच्या पाच वर्षात आपले सरकार होते. मुंबईचे सर्व रखडलेले प्रकल्प आपण केले.
devendra 3.png
devendra 3.png

मुंबई : बिहारमध्ये निवडणूक जिंकण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सर्वसामान्य योजनांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना मोदी हेच आधार वाटतो आहे. त्यामुळेच भाजप बिहारची निवडणूक जिंकली, असे गुपित विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले.

भाजपच्या बैठकित ते बोलत होते. ते म्हणाले, की बिहारमध्ये आपण जिंकलो, त्या वेळी तुम्ही सर्वांनी अभिनंदन केले. परंतु त्यात माझा खारीचा वाटा आहे. बिहार जिंकण्याचे कारण म्हणजे मोदीजींच्या गरीब कल्याण योजनेचा लाभार्थी आहे. त्यांच्या लक्षात आले की आमचे तारणहार मोदी आहेत. बिहारकडे सर्वांचे लक्ष होते. आपण पुर्वेमध्ये बिहार जिंकलो, उत्तर पुर्वेत मनिपूर, उत्तरेत उत्तरप्रदेश, पश्चिमेमध्ये गुजरात व मध्यप्रदेश जिंकलो, दक्षिणेत तेलंगणा व कर्नाटक जिंकलो. म्हणजे एकाच दिवशी आपण सर्व दिशांचे राज्य जिंकलो. त्याचे कारण म्हणजे लोकांना देशात कर्मयोग आवडतो, बोलघेवडेपणा आवडत नाही. वेगवेगळे नेते, सरकार, वेगवेगळ्या पक्षाचे नेते केवळ एकच अजेंडा होता बोलघेवडापणा. रोज मेदीजींच्या नावाने ओरडायचे. मोदीजींनी दिलेले पॅकेज सर्व लोकांसाठी होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

बोलघेवडेपणाला येथे थारा नाही

ते म्हणाले, की बिहारमध्ये मी पोहोचलो, त्या वेळी लोक सांगायचे, की मोदीजींमुळे अकाउंट मे पैसा आया. मोदीजींमुळे आमचे संसार तारले. आम्हाला कोणाचे घेणेदेणे नाही. आम्ही मोदीजींच्या नावावरच मतदान करू, असे बिहारची जनता म्हणत होती. महिलांनी मतदान मोठ्या प्रमाणात केले. भाजपला मतदान केले. त्यामुळे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, की खऱ्या अर्थाने जो सामान्य माणसांसाठी काम करतो. त्याच्या मागे जनता उभे राहते. जे बोलघेवडेपणा करतात, त्यांना जनतेची साथ मळत नाही, असे ते म्हणाले.

 मुंबईचे प्रकल्प आपण मार्गी लावले

महाराष्ट्रात सरकारच्या माध्यमातून काय चालले आहे, मागच्या पाच वर्षात आपले सरकार होते. मुंबईचे सर्व रखडलेले प्रकल्प आपण केले. ट्रान्स हार्बल लिंकचे काम सुरू केले. कुस्टल रोड आपण केला. त्यासाठी मी दोन महिन्यांनी दिल्लीला जात होतो. अनेक अडचणीतून, संघर्ष करून सर्व जीआर बदलले व भारतात कुस्टलरोड मंजूर करून घेतल्या. त्याच्या सर्व परवानग्या आपण आणल्या होत्या. रोरो आपल्या काळात झाली. आता पुढच्या काळात आणखी रोरो बस येतील. हे सर्व आपण केले आहे. या सरकारने काय केले, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

बीडीडी चाळ, धारावीचा प्रश्न

बीडीडी चाळीसारखा अनेक वर्षांपासून अडकलेला प्रकल्प आपण केला. आज या सरकारमध्ये काय चालले. एल अॅण्ड टी सारखी कंपनी परत चालली. कारण सरकारची मदतच नाही. त्यामुळे ते चालले परत. जो प्रकल्प मराठी माणसांना आधार ठरणार होता, तो परत चालला आहे. मराठी माणसांना त्याच्या स्वप्नातील घर देत होता, त्या मराठी माणसांना थेट मुंबईमध्ये जे घरत मिळत होते, ते स्वप्न पुन्हा पाच वर्षे पुढे जाईल, अशी अवस्था त्या बीडीडी चाळीची झाली आहे. धारावीचा प्रश्न निर्माण झाला आहे. धारावीला रेल्वेची जागा मिळाली, तर सात वर्षात धारावी बदलून जाईल, याबाबत मोदी यांना विनंती केली होती. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा आपण 800 कोटी मोजले. आता हा प्रकल्प कोणीही रोखू शकत नाही. त्यावर 70 एकरवर बांधकाम केले की बरेचसे काम मार्गी लागणार आहे. धारावीचा प्रकल्प हा पूर्णपणे आपल्या काळात झाला आहे.

 Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com